अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो|
प्रतिपदेपासूनी ती घटस्थापना करूनी हो|
मूलमंत्र जप करूनी भोवते रक्षक ठेवूनी हो|
ब्रम्हाविष्णूरुद्र आईचे पूजन करीती हो ।।।1।।
प्रतिपदेपासूनी ती घटस्थापना करूनी हो|
मूलमंत्र जप करूनी भोवते रक्षक ठेवूनी हो|
ब्रम्हाविष्णूरुद्र आईचे पूजन करीती हो ।।।1।।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।।धृ।।
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनि हो।
सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो।।
कस्तुरीमळवट भांगी शेंदुर भरूनी हो।
उदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनि हो ।।।2।।
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो।
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो।।
कंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा हो।
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ।।3।।
चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो।
उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणीं हो।।
पूर्ण कृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो।
भक्तांच्या माऊली सुर ते येती लोटांगणी हो ।।4।।
पंचमीचे दिवशीं व्रत तें उपांगललिता हो।
अर्घ्यपाद्यपूजनें तुजला भवानी स्तविती हो।।
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो।
आनंदे प्रेम तें आलें सद्भावे क्रिडता हो ।।5।।
षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो।
घेऊनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो।।
कवडी एक अर्पितां देसी हार मुक्तफलांचा हो।
जोगावा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळा हो ।।6।।
सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो।
तेथें तूं नांदसी भोवतें पुष्पें नानापरी हो।।
जाईजुई- शेवंती पूजा रेखियली बरवी हो।
भक्त संकटी पडतां झेलूनि घेसी वरचे वरी हो ।।7।।
अष्टमीचे दिवशी अष्टभुजां नारायणी हो।
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो।।
मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो।
स्तनपान देऊनि सुखी केली अंतःकरणीं हो ।।8।।
नवमीचे दिवशी नवदिवसांचें पारणें हो।
सप्तशतीजप होम हवनें सद्गक्ती करूनी हो।।
षड्रसअन्ने नैवेद्यासी अर्पियेली भोजनी हो।
आचार्य ब्राह्मणा तृप्त केलें कृपेंवरूनी हो ।।9।।
दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो।
सिंहारुढे दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनी हो।।
शुंभनिशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो।
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो ।।10।।
