श्री गणेशाय नमः ॥
आधीं नमू श्रीसद्गुरूनाथा । भक्तवत्सल कृपावंता ।
तुजवांचूनि या जगीं त्राता । अन्य आतां नसेचि ॥ १ ॥
अवतार घेतला समर्थ । नाम शोभे कृपावंत ।
पाप जाळूनियां सत्य । भार उतरिला जगतींचा ॥ २ ॥
मूळ स्वरूप निर्गुण । निराकार नित्य ध्यान ।
अघटीत लीला करूनि जाण । तारिलें जना कौतुकें ॥ ३ ॥
म्हणुनि नमन तुझे पायीं । तुजविण अन्य दाता नाहीं ।
विश्वव्यापक तूंच पाहीं । ध्याती हृदयीं साधुजन ॥ ४ ॥
रूपारूपासी वेगळा । गुणगुणाच्या निराळा ।
परी अघटित जगीं कळा । सूत्र हातीं वागवित ॥ ५ ॥
स्वस्वरूपीं निपुण । सादर कराया जगतीं पालन ।
स्वामीनाम सगुण । उद्धराकारण धरियेलें ॥ ६ ॥
तो दिगंबरवेष द्वैतरहित । दत्तदिगंबर हाची सत्य ।
भार उतरावया यथार्थ । कलियुगीं समर्थ अवतरला ॥ ७ ॥
दीन जनांचिया पोटीं । पाप जाळूनि तारी संकटीं ।
नाम जयाचें धरितां कंठीं । मग सृष्टीं भय नाहीं ॥ ८ ॥
ॐ आदिस्वरूपरूपा । ओंकार निर्गुणरूपा ।
जगव्याप्यव्यापककौतुका । दाखविता सखा तूंचि खरा ॥ ९ ॥
कोण करील तुझी स्तुती । शेष शिणला निश्चितीं ।
तेथें मानव बापुडे किती । अल्पमती निर्धारें ॥ १० ॥
सुख करा स्वामीराया । भक्तवत्सला करुणालया ।
जगतारक तुझ्या पायां । नमन माझें सर्वदा ॥ ११ ॥
मी अन्यायी थोर । परी तूं कृपेचा सागर ।
जगतारावया निर्धार । सगुण अवतार धरियेला ॥ १२ ॥
जयजयाजी गुरुनाथा । भक्तवत्सला समर्था ।
तुजवांचूनि अन्य त्राता । मज आतां पाहतां नसेचि ॥ १३ ॥
सर्व सुख सगुण । अवतार हाचि पूर्णब्रह्म जाण ।
जग तारावया कारण । अवतार जाण धरियेला ॥ १४ ॥
अनंत ब्रह्मांडाचा नायक । तूंचि सखा माझा देख ।
तुजवांचूनि अन्य कौतुक । नको नको मजलागीं ॥ १५ ॥
कैसी करावी तुझी स्तुती । हें मी नेणें बा निश्चितीं ।
चरणीं जडो तुझ्या प्रीती । ऐसें आतां करावें ॥ १६ ॥
दीन दयाळा गुरुराया । भावें वंदिलें तुझ्या पायां ।
सोडिली समूळ मोहाची माया । आतां मज वायां दवडू नको ॥ १७ ॥
हें स्तोत्र तुझें लघुस्थिती । तूंचि बोलविता निश्चितीं ।
भक्त तारावया गुरुमूर्ती । अवतारस्थिती दाविली ॥ १८ ॥
दीनवत्सला स्वामिराया । अगाधतेजा करुणालया ।
अघटित जगतीं तव माया । लीला कौतुक निर्धार ॥ १९ ॥
निरंजन स्वरूपरूपा । विश्वरूपा आदिरुपा ।
अक्कलकोटीं दावूनि कौतुका । जगसुखा राहिला ॥ २० ॥
अक्कलकोटीं जरी जन । अवचित कोणी जातां जाण ।
उद्धार तया कारण । स्वामिकृपें होय खरा ॥ २१ ॥
अवधूतवेष निर्धारी । निर्गुण निराकारी ।
तेज पाहतां थरारी । काळ पोटीं बापुडा ॥ २२ ॥
वेदीं रूप वर्णिलें निर्धार । तैसी लीला दाविली साहाकार ।
विश्वविश्वंभर गुरुवर । सद्गुरूनाथ स्वामी माझा ॥ २३ ॥
चरण पाहतां सुकुमार । कैसें पूजावें निर्धार ।
ठेऊनि प्रेम गादीवर । सत्य सादर पूजावें ॥ २४ ॥
प्रेम गंगा यमुना सरस्वती । सिंधु कावेरी भागीरथी ।
तयासी प्रार्थावें निश्चितीं । स्नानालागीं समर्थाच्या ॥ २५ ॥
मन कलश घेऊनि निर्धार । प्रेम गंगा जलसागर ।
स्नान घालूनि उत्तरोत्तर । पूजन प्रकार करावा ॥ २६ ॥
आवडी अक्षता निर्धारीं । सुमन संगती घेऊनि वरी ।
सद्गुरुनाथ पुजावा अंतरी । प्रेमभरी होऊनियां ॥ २७ ॥
भक्तिची ती जाण । वरी नामाचा चंदन ।
शांती केशर मिळवून । गंध अर्चन समर्थांचे ॥ २८ ॥
क्षमा धूप दीप निर्धारीं । प्रेम नैवेद्य वरी ।
भावें समर्पोनि निर्धारीं । सद्गदित अंतरीं होऊनियां ॥ २९ ॥
क्रोध कापूर जाळावा । प्रेमें स्वामी आळवावा ।
आवडीचा तो ध्यानीं पहावा । शुद्ध चित्त करूनियां ॥ ३० ॥
ऐसी पूजा झालियावरी । मग प्रार्थावा निजांतरी ।
हृदयीं उठती प्रेमलहरी । ऐशापरी आळवावा ॥ ३१ ॥
जयजयाजी गुरुराया । जयजयाजी करुणालया ।
भक्ता दाउनियां पायां । भवभया निवारिलें ॥ ३२ ॥
जयजयाजी अनंतरूपा । जयजयाजी आदिरुपा ।
चुकवा चुकवा जन्मखेपा । मार्ग सोपा दाऊनियां ॥ ३३ ॥
जयजयाजी त्रिगुणा । जयजयाजी अवतार सगुणा ।
पुरवावया मनकामना । जनीं वनीं फिरीयेला ॥ ३४ ॥
जयजयाजी दिगंबरा । जयजयाजी सर्वेश्वरा ।
मज सांभाळा लेंकरा । तुजविण आसरा नाहीं नाहीं ॥ ३५ ॥
जयजयाजी समर्था । स्वामिराया कृपावंता ।
। तुजविण आम्हां त्राता ॥ नाहीं नाहीं जगत्रयीं ॥ ३६ ॥
शुद्धतेजा तेजरुपा । दिव्य स्वस्वरूपा ।
चुकवा चुकवा जन्म खेपा । आदिरुपा जगद्गुरू ॥ ३७ ॥
जयजयाजी यतिरुपा । जयजयाजी अघटित स्वरूपा ।
निर्गुण सगुणरूपा । सच्चिदानंद जगद्गुरू ॥ ३८ ॥
जयजयाजी त्रिगुणरहिता । जयजयाजी त्रिदोषहारका ।
जयजयाजी ब्रह्मांडनायका । निजभक्त सख्या स्वामिराया ॥ ३९ ॥
जयजयाजी दत्तात्रेया । जयजयाजी करुणालया ।
जयजयाजी विश्वमाया । संशयभयहारका स्वामिराया ॥ ४० ॥
जयजयाजी आनंदविलासा । जयजयाजी पापतमनाशा ।
जयजयाजी अवधूतवेषा । भवभयपाश निवारका ॥ ४१ ॥
जयजयाजी निजभक्तपालका । जयजयाजी विश्वव्यापका ।
निज दासासि सखा । कलियुगीं देखा तूं एक ॥ ४२ ॥
जयजयाजी विराटस्वरूपा । जयजयाजी आदिरूपरूपा ।
जयजयाजी विश्वव्याप्यव्यापका । मायबापा गुरुराया ॥ ४३ ॥
त्रिलोकीं तूं समर्थ । अवतार तुझाचि यथार्थ ।
तारक भक्तांलागीं सत्य । दैवीरूप दाऊनि ॥ ४४ ॥
तूं पूर्णब्रह्म जाण । निर्विकार निर्गुण ।
निरंजनी सदा ध्यान । लीला कौतुक दाविलें ॥ ४५ ॥
तेज पाहतां थरारे । कली मनीं सदा झुरे ।
विश्वव्यापक व्यापूनि उरे । तारक खरे पतितासी ॥ ४६ ॥
तुजविण आणिक आधार नाहीं । कलियुगीं दुजा आम्हां पाहीं ।
सद्गुरुनाथ तूंचि खरा तोही । अवताररूपें नटलासी ॥ ४७ ॥
लीला दाविली अगाध । शेषा न करवे त्याचा शोध ।
जें तुम्ही केलें विविध । ज्ञानरूपें जाणविलें ॥ ४८ ॥
अक्कलकोटमहापुरीं । वास केला निर्धारीं ।
पवित्रक्षेत्र करूनि तारी । पाय ठेऊनि जगतासी ॥ ४९ ॥
तरी जनीं सत्य आतां । अक्कलकोटीं जावें तत्वतां ।
हित साधावया यथार्थ । पवित्र भूमी पैं केली ॥ ५० ॥
हें वचन निर्धार । समर्थांचें असे साचार ।
बोल बोलवितां उत्तर । स्वामी माझा निर्धारीं ॥ ५१ ॥
अक्कलकोटीं करितां अनुष्ठान । हें स्तोत्र वाचितां एक मास तेरा दिन ।
शुद्ध चित्त करून । ध्यान सदा समर्थांचें ॥ ५२ ॥
भिक्षान्न निर्धारीं । पवित्र राहे सदा अंतरी ।
षण्मास वाचितां तरी । महाव्याधी दूर होय ॥ ५३ ॥
एक संवत्सर अनुष्ठान । वटछायेसी करितां जाण ।
तयासी होईल पुत्र संतान । वचन सत्य समर्थांचें ॥ ५४ ॥
तेरा मासी जोडे धन । चतुर्दश मासीं लक्ष्मीवंत जाण ।
प्रेमभावें करितां अनुष्ठान । सत्य वचन निर्धार ॥ ५५ ॥
वटपूजा आवडी पूर्ण । तेथेंचि पादुका स्थापून ।
प्रेमभावें करितां अनुष्ठान । मनोरथ पूर्ण होतील ॥ ५६ ॥
कलियुगीं तारक निर्धारीं । स्वामी माझा सगुण अवतारी ।
जग तारावया निर्धारीं । सृष्टीवरीं पैं आला ॥ ५७ ॥
तरी सादर सादर मन । ठेऊनि वंदा आतां चरण ।
पुढें न मिळे ऐसें निधान । मायाबंधन तोडावया ॥ ५८ ॥
नाम घेतां निर्धारीं । स्वामी माझा कैवारी ।
भवामाजीं पार करी । वचन निर्धारीं सत्य हो ॥ ५९ ॥
आनंद म्हणे तरी आतां । स्वामीराया जी समर्था ।
भक्तवत्सला कृपावंता । वाचितां जगव्यथा चुकवावी ॥ ६० ॥
हाच देऊनि प्रथम वर । भक्तिपंथ वाढवावा निर्धार ।
आणिक काहीं मागणें साचार । तुजपाशीं दयाळा ॥ ६१ ॥
परोपकार हाचि एक । तुझ्या नामें तारावे लोक ।
आणिक मागणें तें कौतुक । नाहीं नाहीं सर्वथा ॥ ६२ ॥
विश्व विश्वाकारी । विश्वरूप तूंचि निर्धारीं ।
चालविता तुजविण तरी । कोण आहे दयाळा ॥ ६३ ॥
तूंचि सर्व सुखदायक । तूंचि कृपा नायक ।
तुजवांचूनि जगा तारक । नाहीं कोणी सर्वथा ॥ ६४ ॥
आतां न करीं निष्ठुर चित्ता । माय जाणे बालकाची व्यथा ।
तुजवांचूनि अन्य सर्वथा । माय दुजी न जाणो ॥ ६५ ॥
तूंचि मातापिता सर्वेश्वरू । जगतारक जगदगुरू ।
नको नको अव्हेरुं लेंकरुं । दीना उदारु तूं एक ॥ ६६ ॥
दीनदयाघन नाम । तुमचें असे हो उत्तम ।
जग तारावया कारण । स्वामी समर्थ धरियेलें ॥ ६७ ॥
महापूर बोरी पायीं उतरला । मैदार्गीहुनी येतां सोहळा देखिला ।
अक्कलकोटस्थ जनीं डोळां पाहिला । अघटित लीला समर्थांची ॥ ६८ ॥
प्रेम उंदीर सजीव केला । मुक्यासी वाचा देऊनि बोलविला ।
अंधासी रत्नें पारखविला । अघटित लीला जगीं तुझी ॥ ६९ ॥
अघटित केलें चमत्कार । किती लिहावे साचार ।
ग्रंथ वाढेल निर्धार । या भेणें सादर लेखणी आवरिली ॥ ७० ॥
स्वामीचरित्र ग्रंथ निर्धार । पुढें स्वामिराज बोलवील सादर ।
भक्त तारावया निर्धार । कली जोर मोडोनियां ॥ ७१ ॥
म्हणुनियां आतां लघुचरित्र । स्वामी नाम नामाचें स्तोत्र ।
जग तारावया पवित्र । लघुस्तोत्र वर्णिलें ॥ ७२ ॥
अक्कलकोटीं बहु लीला । ज्याणें दाखविली अघटित कळा ।
कोटीमदनमदनाचा पुतळा । स्वरुपीं जयाच्या तुळेना ॥ ७३ ॥
बहु वर्षें एकभूमी वस्ती । एक विचार एक स्थिती ।
अघटित रूप तें निश्चितीं । जगतालागीं तारावया ॥ ७४ ॥
हे निर्जीव पाटावरी । पादुका उठल्या कलिमाझारी ।
अजूनि भुली कैशी जगांतरी । तरणोपाया चुकती हे ॥ ७५ ॥
नाम घेतां प्रेमभरीं । हृदय शुद्ध आधीं करीं ।
दया ठेऊनि अंतरीं । वाच निर्धारीं स्वामिलीले ॥ ७६ ॥
स्वामिपादुकापूजन । नामस्तोत्र भजन ।
तेणें वंश उद्धरे जाण । कलीमाझारी निर्धार ॥ ७७ ॥
म्हणुनियां आतां । स्वामिनाम आठवावें सर्वथा ।
तयावीण अन्य वार्ता । तारक नाहीं जगांत ॥ ७८ ॥
अहा सुंदरस्वरूपनिधान । अहा भक्तवत्सल अगम्य ध्यान ।
सच्चिदानंद आनंदघन । स्वामी माझा दयाळू ॥ ७९ ॥
या प्रपंचमोहाचे काठीं । बुडोनियां जातां रे निकटी ।
तुम्हां तरावया सुलभ गोष्टी । स्वामिनाम पोटीं धरा ॥ ८० ॥
स्वामिनामाचा प्रताप । पाप जाळूनि करी राख ।
अपूर्व दाविलें कौतुक । कलीमाजी तरावया ॥ ८१ ॥
तरी आतां शुद्ध करूनि मन । हेंचि जाण संध्यास्नान ।
दया क्षमा शांती पूर्ण । गुणवर्णन समर्थांचें ॥ ८२ ॥
खोट्याचा जाणूनि पसारा । तोडीं तोडीं मायेच्या व्यवहारा ।
न भुले ह्या दुर्गतीच्या बाजारा । मोहपसारा दूर करोनी ॥ ८३ ॥
मूळबिंदु हा प्रमाण । तेथोनि वाढविता कोण ।
कोणी केलें हो रक्षण । पिंडालागीं जाण पां ॥ ८४ ॥
कैंची माया कैंसा मोह । कोठें आहे तुझा ठाव ।
तो आधीं शोधुनी पहा हो । भुलू नको मानवा ॥ ८५ ॥
मूळ बिंदुरूप प्रमाण । देह झाला बीजा कारण ।
वाढवोनि करचरण । दीनानाथें अर्पिले ॥ ८६ ॥
तेथें झाली जीवशिवाची वस्ती । तीन गुण गुणांची प्राप्ती ।
सहा विकारांची स्थिती । मायेसंगती खेळोनिया ॥ ८७ ॥
दया क्षमा शांती विचार । विवेक ज्ञान जागृतीसार ।
अविद्येची गती निर्धार । सोडोनि भवपार करीतसे ॥ ८८ ॥
धरितां स्वामी नावाची आवडी । घेतां भवामाजीं घाली उडी ।
नेवोनि भक्तां पैलथडी । पार करी दयाळू ॥ ८९ ॥
नाम जगीं तारक । काय सांगू नामाचें कौतुक ।
नामें तारिले कितीएक । महापापी कलियुगीं ॥ ९० ॥
नाम घेतां संकट हरे । वारी केल्या पाप सरे ।
सेवा करितां भवांत तरे । चुकती फेरे चौऱ्यांशीचें ॥ ९१ ॥
अक्कलकोटीं न जातां तरी । वटछायेसी अनुष्ठान करी ।
तयासीं तारक निर्धारीं । दृष्टांतरूपें स्वामी माझा ॥ ९२ ॥
स्वामींची मूर्ति मनोहर । प्रेमें घेऊनि अयन्यावर ।
भावें मांडोनि गादीवर । पूजन करावें प्रेमभावें ॥ ९३ ॥
भजनपूजनाच्या रीती । कलीमाजीं जग उद्धरती ।
प्रेम ठेउनियां चित्तीं । स्वामी कृपामूर्ति आठवावा ॥ ९४ ॥
काय न करी श्रीगुरुनाथ । सत्य होती शरणांगत ।
भक्ततारक अवतार समर्थ । कलियुगीं यथार्थ अवतरला ॥ ९५ ॥
विश्वव्यापक विश्वंभरू । त्यासी कैंची समाधी निर्धारु ।
जगीं जगप्रकार दाखवणें साचारु । लीला थोरु समर्थांची ॥ ९६ ॥
द्वैत नाहीं तिळभरी । आशा कैंची अंतरीं ।
योगमाया दवडिली दुरी । अवतार निर्धारीं स्वामी माझा ॥ ९७ ॥
भक्तांकारणे अक्कलकोटीं । वास केला हो निकटी ।
पाय दाऊनियां सृष्टीं । पतित उद्धार करविला ॥ ९८ ॥
अघटित कळा अघटित लीला । पूर्णतेज तेजाचा पुतळा ।
अगम्य ज्याची अवतार लीला । कलीचा सोहळा मोडावया ॥ ९९ ॥
तरी नामाची संगती । प्रेम ठेउनी सदा चित्तीं ।
स्वामी आठवा दिवसरात्रीं । भवामाजी तरावया ॥ १०० ॥
स्वामीनामाचा सोहळा । धाक पडे कलीकाळा ।
निजदासासी सांभाळी वेळोवेळां । अवतार सोहळा करूनियां ॥ १०१ ॥
कलीमाजी तारक । भक्तासी एकचि नाम देख ।
स्वामीरायाविण कौतुक । आणिक नको सर्वथा ॥ १०२ ॥
स्वामीनामाचें कीर्तन । सप्रेमें पादुकापूजन ।
करितां कलीमाजी जाण । जन उद्धरे निर्धारें ॥ १०३ ॥
स्वामीपंथ तारक । भव नाशील हा सत्य देख ।
कलीमाजीं जगतारक । परमसुखदायक उद्भवला ॥ १०४ ॥
म्हणुनि जनीं आपुल्या हिता । शरण जावें श्रीगुरूनाथा ।
मुखीं धरोनि स्वामीवार्ता । जन्मव्यथा चुकवावी ॥ १०५ ॥
ऐसी भुललिया सोय । पुढें नाहीं रें उपाय ।
भवाचा हा भय । दूर कराया निर्धारीं ॥ १०६ ॥
तरी सुंदर मानवाची काया । नेवोनि लावा स्वामिपाया ।
सुखें निवारा भवभया । मोहमाया तोडोनियां ॥ १०७ ॥
समर्थें दिधलें अभय वचन । जो हें स्तोत्र करील पठण ।
तयाचे मनोरथ पूर्ण । होतील जाण मज कृपें ॥ १०८ ॥
येथें धरितां संशय । तयासी भवामाजी भय ।
पुढें नाहीं ऐशी सोय । सत्य सत्य त्रिवाचा ॥ १०९ ॥
हें लघुस्तोत्र समर्थांचें । मनोभावें करितां पठण याचें ।
अर्थ पूर्ण होतील अर्थिकांचे । परमार्थकांसी मोक्षपद ॥ ११० ॥
आनंद म्हणे तरीं आतां । स्वामिचरणीं ठेऊनि प्रीति सर्वथा ।
प्रेमभावें स्तोत्र गातां । मोक्ष हातां येईल ॥ १११ ॥
इति श्रीस्वामी प्रार्थनास्तोत्र । हें जगतारक पवित्र ।
जपामाजीं महामंत्र । अर्थ सादर पुरवावया ॥ ११२ ॥
इति श्रीगुरुस्वामिचरणारविंदापर्णमस्तु ।
राजाधिराज योगीराज श्रीस्वामी समर्थ महाराजकी जय । श्रीरस्तु । शुभंभवतु ॥