श्रुतिशास्त्रग्रंथ साक्ष संगमू केला॥
महानुभव संतजनी अनुभव चाखियला।
अज्ञान जड जीवां मार्ग सुगम केला॥१॥
आरती ओंवाळीन विमलज्ञान बाळबोधा॥
नवविधा भक्तिपंथें रामरूपानुभवी।
चातुर्यनिधि मोठा मायाचक्र उघवी॥
हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावीं।
बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी॥२॥
नित्यनेमें विवरीतां स्वयें ब्रह्मची होये॥
अपार पुण्य गांठी तरी श्रवण लाही।
कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयीं॥३॥
