Shree Swami Samarth

श्री स्वामी समर्थ आरती

(Jay Jay Avadhuta-Swami Samarth Aarati)

(जय जय अवधूता)

Also known as Jay Jay Avadhuta-Swami Samarth Aarati Marathi · swami samarth

"Jai Jai Avadhuta" — the aarti to Swami Samarth as the avadhuta whose leelas cannot be followed and whose authority runs through all three worlds.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

जय देव जय देव, जय जय अवधूता ।
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता।। जय देव जय देव ॥धृ॥
तुमचे दर्शन होता जाती ही पापे ।
स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते ।
चरणी मस्तक ठेवूनि मनि समजा पुरते ।
वैकुंठीचे सुख नाही या परते ॥१॥
जय देव जय देव, जय जय अवधूता ।
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता।। जय देव जय देव ॥धृ॥
सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा ।
कर्णी कुंडल शोभति वक्षस्थळी माळा ।
शरणागत तुज होतां भय पडले काळा ।
तुमचे दास करिती सेवा सोहळा ॥२॥
जय देव जय देव, जय जय अवधूता ।
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता।। जय देव जय देव ॥धृ॥
मानवरुपी काया दिससी आम्हांस ।
अक्कलकोटी केले यतिवेषे वास ।
पूर्णब्रम्ह तूची अवतरलासी खास ।
अज्ञानी जीवास विपरीत भास ॥३॥
जय देव जय देव, जय जय अवधूता ।
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता।। जय देव जय देव ॥धृ॥
निर्गुण निर्विकार विश्वव्यापक।
स्थिरचर व्यापून अवघा उरलासी एक ।
अनंत रुपे धरसी करणे नाएक ।
तुझे गुण वर्णिता थकले विधीलेख ॥४॥
जय देव जय देव, जय जय अवधूता ।
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता।। जय देव जय देव ॥धृ॥
घडता अनंत जन्मे सुकृत हे गाठी ।
त्याची ही फलप्राप्ती सद्-गुरुची भेटी ।
सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी ।
शरणागत दासावर करी कृपा दृष्टी ॥५॥
जय देव जय देव, जय जय अवधूता ।
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता।। जय देव जय देव ॥धृ॥

Explore More