Lord Dattatreya

श्री सप्तशती गुरुचरित्र अध्याय 8

(Saptashati Gurucharitra Adhyay 8)

Vasudevananda Saraswati

Also known as Saptashati Gurucharitra · Saptashati Gurucharitra 8 · Saptashati Gurucharitra in Marathi

Saptashati Gurucharitra Adhyay 8. The Saptashati Gurucharitra of Vasudevananda Saraswati (Tembe Swami), a condensation of the Gurucharitra into seven hundred verses. It carries the same account of Shripad Shrivallabha and Nrisimha Saraswati in a shorter compass, for those who keep a daily parayana rather than a seven-day one. This adhyay is named in its colophon for शनिप्रदोषव्रतकथनं.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

सिद्ध संक्षेपें सांगत । श्रीपाद तेथूनि येत ।
कृष्णातीरीं होयी स्थित । कुरुपुरांत तारक ॥१॥
मूर्ख प्रजासमवेत । लोकनिंदेनें हो त्रस्त ।
जीव द्याया कृष्णेंत । आकस्मात देखे देव ॥२॥
प्रभू तिला निरोपिती । आत्महत्या दुस्तर म्हणती ।
जन्मांतरीं सुपुत्राप्ती । व्हाया प्रार्थी मग ती नारी ॥३॥
तन्निष्ठा ओळखून । गुरु सांगती आख्यान ।
उज्जनींत चंद्रसेन । शिवार्चन करी प्रदोषीं ॥४॥
त्याचा अमूल्य सन्मणी । हराया नृप तत्क्षणीं ।
घेवोनी अक्षौहिणी । उज्जनी वेढिते ते ॥५॥
हस्त्यश्च रथ पत्ती । पाहोनी न भी चित्तीं ।
शिवा पूजी तो भूपती । तें देखती गोपपुत्र ॥६॥
अश्वत्थ संनिधानीं । अंगणी ते पाषाणीं ।
पूजिती, त्यां नेती जननी । पूजनीं रमे एक बाळ ॥७॥
राहे मेळा जातां एकला । पूजा लोटुनि माता त्याला ।
ओढी तो मूर्छित पडला । शिव त्याला दे सायुज्ज
पुढें नंदस्त्री होऊन । माता लाहे कृष्णनंदन ।
ज्योतिर्लिंग तें देखून । द्वेष सोडून जाती राजे ॥९॥
पुढें सुत व्हावा तरी । शनिप्रदोष तूं करीं ।
येरु म्हणे तुम्हासरी । जन्मांतरी पुत्र व्हावा ॥१०॥
जो भाविकां देई वर । तथा म्हणूनी शिरावर ।
मूर्खपुत्राच्या धरी कर । विद्वद्वर तो जाहला ॥११॥
ती करुनी प्रदोषपूजा । पुढें झाली विप्रात्मजा ।
स्वसमांन नाहीं दुजा । म्हणूनीं हो तस्तुत दत्त ॥१२॥
इति श्री०प०प०वा०स०वि०स०गु० शनिप्रदोषव्रतकथनं नाम अष्टमो०

Explore More