जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी ॥
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी ॥
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता ।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता ।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता ।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां ॥ 1 ॥
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता ।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता ।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां ॥ 1 ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ॥
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं ।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी ।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी ।
शशिकरवदना राजस मदनाची जननी ॥ 2 ॥
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी ।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी ।
शशिकरवदना राजस मदनाची जननी ॥ 2 ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ॥
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी ।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी ।
गायत्री निजबीजा निगमागम सारी ।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥ 3 ॥
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी ।
गायत्री निजबीजा निगमागम सारी ।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥ 3 ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं ।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं ।
वारी मायापटल प्रणमत परिवारी ।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी ॥ 4 ॥
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं ।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं ।
वारी मायापटल प्रणमत परिवारी ।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी ॥ 4 ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ॥
चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी ।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी ।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी ।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥ 5॥
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी ।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी ।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥ 5॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ॥
