Lord Shani

श्री शनि देवाची आरती

(Shree Shani Aarti (Padmakar Shiri Theva — Marathi))

(जय जय श्री शनि देवा)

Also known as Shree Shani Aarti · Shree Shani Aarti Marathi · shani aarti

The Marathi aarti to Shani, sung on Saturdays and at Shani shrines, asking the slow-moving lord of karma for his grace rather than his severity.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

जय जय श्री शनि देवा ।
पद्मकर शिरीं ठेवा ॥
आरती ओंवाळीतों ।
मनोभावें करुनी सेवा ।
जय जय श्री शनि देवा ॥ध्रु०॥
सूर्यसुता शनिमूर्ती ।
तुझी अगाध कीर्ती ॥
एकमुखें काय वर्णूं ।
शेषा न चले स्फूर्ती ॥१॥
जय जय श्री शनि देवा ।
नवग्रहामाजीं श्रेष्ठ ।
पराक्रम थोर तूझा ॥
ज्यावरी तूं कृपाकरिसी ।
होय रंकाचा राजा ॥२॥
जय जय श्री शनि देवा ।
विक्रमासारिखा हो ।
शककर्ता पुण्यराशी ॥
गर्व धरितां शिक्षा केली ।
बहु छळियेलें त्यासी ॥३॥
जय जय श्री शनि देवा ।
शंकराच्या वरदानें ।
गर्व रावणें केला ।
साडेसाती येतां त्यासी ।
समूळ नाशासी नेला ॥४॥
जय जय श्री शनि देवा ।
प्रत्यक्ष गुरुनाथा ।
चमत्कार दावियेला ।
नेऊनी शूळापाशीं ।
पुन्हा सन्मान केला ॥५॥
जय जय श्री शनि देवा ।
ऐसे गुण किती गाऊं ।
धणी न पुरे गातां ॥
कृपा करीं दीनावरीं ।
महाराजा समर्था ॥६॥
जय जय श्री शनि देवा ।
दोन्ही कर जोडोनीयां ।
रुक्मा लीन सदा पायीं ॥
प्रसाद हाचि मार्गे ।
उदयकाळ सौख्य दावीं ॥७॥
जय जय श्री शनि देवा ।
पद्मकर शिरीं ठेवा ॥
आरती ओंवाळीतों ।
मनोभावें करुनी सेवा ॥

Explore More