Lord Dattatreya

श्री सप्तशती गुरुचरित्र अध्याय 30

(Saptashati Gurucharitra Adhyay 30)

Vasudevananda Saraswati

Also known as Saptashati Gurucharitra · Saptashati Gurucharitra 30 · Saptashati Gurucharitra in Marathi

Saptashati Gurucharitra Adhyay 30. The Saptashati Gurucharitra of Vasudevananda Saraswati (Tembe Swami), a condensation of the Gurucharitra into seven hundred verses. It carries the same account of Shripad Shrivallabha and Nrisimha Saraswati in a shorter compass, for those who keep a daily parayana rather than a seven-day one. This adhyay is named in its colophon for प्रेतांगनाशोको.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

दत्ताधिष्ठित माहोर । तेथें गोपीनाथ विप्र ।
तया होउनी मेले पुत्र । दत्तवर वांचवी एक ॥१॥
ते निष्ठा दत्तावर । ठेउनी करिती संस्कार ।
त्याचा विवाह केला थोर । हर्षे सादर मायबापें ॥२॥
त्यां होय रुप समान । साजे जोडें देवासमान ।
पतिसेवेवांचून । सतीमन न विसंबे ॥३॥
सून महा पतिव्रता । तयां हर्ष हो पहातां ।
तंव आली दुर्दैवता । रोग सुता त्या हो असाध्य ॥४॥
होऊन क्षयरोग । क्षीण झालें पतिचें आंग ।
जेवीना तो तसी चांग । सती हो रोग नसतांही ॥५॥
हो पश्चात्ताप द्विजांला । व्यर्थ वरिली सुभगेला ।
म्हणे तुझा भोग सरला । माहेराला जांई सुखें ॥६॥
ती भयंकर वाचा । ऐकून म्हणे तुमचा ।
जेथ देह तेथ हा साचा । असे तुमचा अर्धात्मा हा ॥७॥
नसो वियोग म्हणून । सासुसासर्‍यां प्रार्थून ।
धवा घेऊन डोंळींतून । ये गाणगाभुवना ॥८॥
त्रिदोष वाढुनी जाण । द्विज झाला गतप्राण ।
सती उठे द्याया प्राण । निवारण करी जन ॥९॥
तीं तयाचे आठवी गूण । रडे शीर्ष आपटून ।
म्हणे रुसे गौरिरमण । कोण चोरुन ने सौभाग्या ॥१०॥
जैं धेनु जातां शरण । राखुनि घे यवन प्राण ।
भेटूं जातां देवा पडून । टाकीं चुरुन देऊळ कीं ॥११॥
तेणें अप्री झालें मज । देवा शरण येतां आज ।
न राखसी माझी लाज । देवा तुज कींव न ये कीं ॥१२॥
ती असे करी विलाप । तंव आला आपोआप ।
तो दीनाचा मायबाप । गुरु रुप पालटोन ॥१३॥
तीसि वदे कां रडसी । जीव ये कीं रडतां यासी ।
मायामय संबंधासी । व्यर्थ म्हणसी पति मेला ॥१४॥
देव तेही काळाधीन । तुम्ही तरी मर्त्य जाण ।
पाहूं जातां विचारुन । मेला कोण कोण जन्मला ॥१५॥
देह उत्पन्न होऊन । मरे त्याहुन विलक्षण ।
आत्मा निंत्य विकारहीन । संबंधी न कवणाचा तो ॥१६॥
त्या उत्क्रान्तीव्यापकाकैंची । वार्ता न त्या संबंधाची ।
नदीकाष्टवत्‌ हो देहांची । भेटी हेची कर्मयोगें ॥
ह्या अमंगळ देहाच्या । तादात्में भ्रम कर्मांचा ।
गुणमूल अज्ञानाचा । हो कीं साचाम परिणाम ॥
तूं अतंद्रित होऊन । दे हा संबंध सोडून ।
जेणें जासी उद्धरुन । तें साधून घेई शीघ्र ॥१९॥
रक्तास्थि मांसा न रडें । हें ऐकून ती पायां पडे ।
म्हणे बापा शोकीं पडे । काढा कडे सोयरे तुम्हीं ॥
इति श्री०प०प०वा०स०वि० सारे प्रेतांगनाशोको नाम त्रिंशो०

Explore More