अवतरलासी भूवर जड मूढ ताराया ॥
जय जय गजानन...॥
स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी॥
तें तूं खरोखर निःसंशय अससी।
लीलामात्रें धरिलें मानव देहासी॥१॥
जय जय गजानन...॥
करुनी 'गणि गण गणात बोते' या भजना॥
धाता हरिहर गुरुवर तूंचि सुखसदना।
जिकडे पहावे तिकडे तूं दिससी नयना॥२॥
जय जय गजानन...॥
पेटविले त्या अग्नीवांचुनि चिलमेस॥
क्षणांत आणिले जीवन निर्जल वापीस।
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश॥३॥
जय जय गजानन...॥
करविलें भक्तांलागी विठ्ठल दर्शन॥
भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण।
स्वामी दासगणूचे मान्य करा कवन॥४॥
जय जय गजानन...॥
