पश्चिमे चालवीलें आत्मस्तुती निर्धारीं। त्रिकुटावरी नांद देखियेला पंढरी॥१॥
हेतु हा मावळला शब्दा आली निःशब्दता। तटस्थ होऊनि ठेलों नीजरूप पहातां॥२॥
रविशशि मावळले तया तेजामाझारीं। वाजती दिव्य वाचें अनुहाते गजरी॥३॥
सद्गुरुचेनि संगें ऐसी आरती केली। निवृत्तीनें आनंदाची तेथे वृत्ति निमाली॥४॥
