विश्वंभरा विश्वेशा। तारक तू जगता॥
प्रत्यय निजभक्तांचे अद्भुत दावियेले॥
ब्रह्मा विष्णु शङ्कर गणपती तू त्राता।
भजतां तव पदकमला हरिसी भवचिंता॥१॥
रोगग्रस्तां तुझिया उदिनें तारियले॥
वांझेसी तोषविलें देऊनिया पुत्रा।
जो जो वांछिल त्यांचा तू अससी दाता॥२॥
सन्मार्गा लावुनिया उद्धरिले त्यांना॥
ऐशी तू सकलांची ममताळू माता।
रोमांचित तनु होई गुण महिमा गातां॥३॥
आयुर्बल देऊनि त्या सकला तोषविले॥
ऐसे सामर्थ्याचे प्रताप तव गातां।
शिणली मति मग आलों शरण तुला नाथा॥४॥
त्यांची चिंता लागे रात्रंदिन मजसी॥
ऐसे दृढ आश्वासन दिधलेसी जगता।
करुणेचा सागर तू अससी गुरुनाथा॥५॥
ऋद्धिसिद्धी घेती लोळण तव पायीं॥
अंतर साक्षी तुजला सर्वांची वार्ता।
अगम्य तुजला कांहीं ऐसा तू ज्ञाता॥६॥
