Shree Swami Samarth

श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 10

(Shri Swami Samarth Saptashati Adhyay 10)

Also known as Swami Samarth Saptashati · Swami Samarth Saptashati adhyay 10 · Shri Swami Samarth Saptashati 10

Shri Swami Samarth Saptashati Adhyay 10. The Shri Swami Samarth Saptashati, seven hundred verses on Shri Swami Samarth of Akkalkot, arranged for parayana. It is read through in ten adhyays, commonly across a week, by those who keep the Swami's worship.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 71
श्री गणेशाय नमः ।
ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ।
श्री समर्थ सप्तशती ग्रंथ । समर्थ इच्छे निर्माण होत ।
त्याचा तोची करीत । अक्षरब्रह्म तो असे ॥१॥
मी येथे निमित्त । ही त्याची लीला असत ।
हा ग्रंथ नव्हे अमृत्र । भरोनिया वाढले ॥२॥
ही दत्ताची वाडमय मूर्ती । प्रकटली असे येथप्रताई ।
अजानुबाहू दत्तमूर्ती । राहे व्यापूनी ग्रंथाते ॥३॥
श्रवण पठणे परमार्थ । लाभे भक्तांसी निश्चित ।
साधका आत्मज्ञान प्राप्त । समर्थकृपे होत असे ॥४॥
समर्था या कलियुगात । तूची एक महासमर्थ ।
दिव्य अनुभव भक्तांप्रत । मिळावे तुझ्या करुणेने ॥५॥
ऊँ श्री स्वामी समर्थ । जे सप्तशती वाचीत ।
सारथी होऊनी तयाप्रत । निजात्म सुख तू दावावे ॥६॥
तू आदि अंतरहित । परब्रह्म तू साक्षात ।
अवधूत निरंजन दत्त । विविध रुपे राहसी तू ॥७॥
हे विश्व तव स्वरुप । तू ब्रह्माण्डाच्या अतीत ।
अजानुबाहू समर्थ । दत्तात्रेया गुरुवर्या ॥८॥
या ग्रंथाच्या अक्षराअक्षरांत । परब्रह्म श्री स्वामी समर्थ ।
व्यापोनी राहो प्रार्थित । श्री दत्त परब्रह्मासी ॥९॥
पठणे पुरवावे मनोरथ । प्रगती व्हावी अध्यात्मात ।
कुंडलिनी व्हावी जागृत । केवळ पठणे ग्रंथाच्या ॥१०॥
जो योगसाधना करीत । सोऽहम्‍ ध्याने आरधित ।
त्या सर्वा मार्ग प्राप्त । व्हावा ग्रंथ पठणाने ॥११॥
हा ग्रंथ नव्हे सद्‍गुरु । ऐसी व्हावी ख्याती थोरु ।
स्वामी समर्थ क्रृपासागरु । वरदान देती ग्रंथाते ॥१२॥
परब्रह्म प्रकाशमार्ग । तो हा सप्तशती ग्रंथ ।
पठणे मार्ग मिळत । सद्‍भक्तासी निश्चये ॥१३॥
परब्रह्म स्वामी समर्थ । ग्रंथासी वरदान देत ।
हा ग्रंथ नव्हे मी साक्षात । ऐसे माना भाविक हो ॥१४॥
केवळ लोकोध्दारार्थ । समर्थ ग्रंथ लिहवीत ।
परमार्थी प्रगती होत । ग्रंथ पठणे निश्चये ॥१५॥
नित्य करावे ग्रंथपठण । तैसेची करावे सोऽहम्‍ ध्यान ।
आणि मानस पूजन । नित्य करावे समर्थाचे॥१६॥
तयाचा प्रपंच परमार्थ । मी स्वये सिध्द करीत ।
ऐसे ग्रंथ महात्म । स्वये समर्थ सांगतसे ॥१७॥
ऐसे ऐकोनी वचन । द्त्त संतोष पावोन ।
म्हणे मज अपेक्षेहून । बहुत दिधले ईश्वरा ॥१८॥
असो स्वामी समर्थ । तया प्रज्ञापुरात ।
अनेक लीला करीत । चराचरी रहोनिया ॥१९॥
गिरनारहून येती सिध्द । हिमालयातून योगी येत ।
म्हणती स्वामी राहत । हिमालया माझारी ॥२०॥
कोणी म्हणती गिरनारी । समर्थ राहती तेथवरी ।
ऐसे लोक नाना परी बोलत राहती सर्वदा ॥२१॥
एकाच वेळी रुपे अनंत । घेऊनी स्वामी फिरत ।
भक्ता सर्वत्र भेटत । सर्वात्मक ते श्री स्वामी ॥२२॥
कधी काशीत प्रकटत । रामेश्वराही असत ।
अबू गिरनारीही राहत। एकाच वेळी श्री स्वामी ॥२३॥
सहस्ररुपे धरोन । करिती लोकांचे कल्याण ।
श्री स्वामी समर्थ भगवान । करुणासागर जगताचे ॥२४॥
कधी गुप्त कधी प्रकट। कधी आकाशवाणी बोलत ।
कधी मलंग पठाण वेषात । फिरे दत्त महास्वामी ॥२५॥
आजही सदेह रुपात । स्वामी राहती फिरत ।
या विश्वाचे ते विश्वनाथ । चिंता करिता विश्वाची ॥२६॥
ऐसा स्वामी समर्थ । चराचरी भरोनी राहत ।
परी काही स्थाने असत । सिध्दपीठ त्या देवाची ॥२७॥
नृसिंहवाडी गाणगापूर । तैसेची ते औदुंबर ।
अक्कलकोट अबू गिरनार । सिध्दपीठ असती ही ॥२८॥
ऐसी काही स्थाने असत । परी भक्त हृदयी राहत ।
निर्मल मने आठवीत । समर्थ जवळी राहतसे ॥२९॥
म्हणोनी सद्‍भक्तांनी । चिंता वाहावी गुरुचरणी ।
मानसपूजा करोनी । स्मरण करावे दत्ताचे ॥३०॥
ते राम ते कृष्ण । दत्त दिगंबर नारायण ।
ते साक्षात परब्रह्म । ऐसे स्व्ररुप समर्थांचे ॥३१॥
सर्व रुपे त्यांची असत । काली दुर्गाही तेची असत ।
मनी होऊनी निश्चित । भजावे स्वामी समर्थांना ॥३२॥
नित्य करावे पूजन । सोऽहम्‍ मंत्रे करावे ध्यान ।
हेची उत्तम साधन । मोक्षमार्गाते पावाया ॥३३॥
एक प्रहर ध्यान करीत । बारा वर्षांत होई सिध्द ।
ऐसे स्वामी समर्थ । स्वये मजला सांगितले ॥३४॥
श्री स्वामी समर्थ । विश्वावरी कृपा करीत ।
मार्ग परमार्थ दावीत । लोकोध्दारा कारणे ॥३५॥
एक भक्त दर्शनार्थ । दुरोनी येई चालत ।
पाहोनिया स्वामीप्रत । अति विस्मित होतसे ॥३६॥
म्हणे हिमालयात । स्वामी मजला दर्शन देत ।
ऐसे म्हणोनी एकटक । पाहत राहे स्वामींना ॥३७॥
त्यासी समाधी लागत । तटस्थ होऊनी तो जात ।
वैकुंठ दर्शन होत । समाधित तयालागी ॥३८॥
जागृत होऊनी भक्त । सर्व लोकांसी सांगत ।
अहो तया वैकुंठात । पाहिले मी स्वामींना ॥३९॥
दिव्य सिंहासन असत । रत्ने जडली असंख्यात ।
लक्ष्मी देवदेवता दिसत । वेष्ठोनिया स्वामींना ॥४०॥
दिव्य सिंहासन असत । रत्न जडली असंख्यात ।
लक्ष्मी पायाशी बैसत । ऐसा महिमा स्वामींचा ॥४१॥
गरुड आणि हनुमंत । गणपती आणि अनेक सिध्द ।
स्वामी चरणाते सेवीत ।ऐसा महिमा स्वामींचा ॥४२॥
अणिमादि अष्टसिध्दी । चवरी घेऊनी हाती ।
सेवा स्वामींची करिती । ऐसा महिमा स्वामींचा ॥४३॥
ब्रह्मज्ञान आत्मज्ञान । समाधी आणि योगज्ञान ।
कायाकल्पाचेही ज्ञान । समर्थकृपे मिळतसे ॥४४॥
नाना विद्या नाना कला । समर्थ चरणी राहिल्या ।
म्हणोनी त्यांच्या सेवकाला । उणे पडेना काहीही ॥४५॥
कल्पवृक्ष कामधेनू चिंतामणी । लक्ष्मी भरे जेथे पाणी ।
सर्व देव हात जोडोनी । चरणी तिष्टती सर्वदा ॥४६॥
ऐसे ब्राह्मण सांगत । परमानंदे नमन करीत ।
ऐसा स्वामी समर्थ । अक्कलकोटी राहिला ॥४७॥
स्वामी लीला सहचर । भाग्य त्यांचे अपार ।
स्वनयने पाहिला परमेश्वर । सांगाती ते राहिले ॥४८॥
चोळाप्पा स्वामींचा महाभक्त । अनेक लीला त्यासी दावीत ।
त्याचेसाठीच येत । अक्कलकोटात श्री स्वामी ॥४९॥
राहती त्याचे घरात । त्याचे मुलांसवे निजत ।
ऐसा भक्त भाग्यवंत । घरी ठेविले ईश्वर ॥५०॥
स्वामीसुत श्रेष्ठ भक्त ।स्वामींसी एकात्म पावत ।
स्वामी पताका नेत । दर्यापार विदेशासी ॥५१॥
सुंदराबाई सेवक । स्वामींसी ठेवी मुठीत ।
ती निजा म्हणता स्वामी निजत । ऐसा धाक तियेचा ॥५२॥
बाळाप्पा प्रेमळ भक्त । राही सदैव जप करीत ।
श्री स्वामी समर्थ । मंत्र त्याने निर्मिला ॥५३॥
सदानंद साधू असत । हुक्का देती समर्थाप्रत ।
चरण संवाहन करीत । सारी रात्र राहतसे ॥५४॥
कानफाटया नाथ । श्री स्वामींची सेवा करीत ।
चिंतोपंत टोळ असत । लीला सहचर स्वामींचे ॥५५॥
भुजंगा चपरासी असत । श्रीपाद भट पूजा करीत ।
अक्कलकोटचे राजे असत । लीला सहचर स्वामींचे ॥५६॥
गवे स्वामी आणिक । स्वामींचे सांगाती असत ।
अवधूतबुवा असत । सेवा करिती स्वामींची ॥५७॥
शेषाचार्य अग्रिहोत्री । स्वामींसी तपकीर देती ।
असे बहू सात्विक मूर्ती । लीला सहचर स्वामींची ॥५८॥
स्वामी बहू मानीत । हास्यविनोदही करीत ।
शेषाचार्य प्रिय असत । सदा स्वामी समर्थांसी॥५९॥
जव स्वामी कोपत । राजाही पुढे जावो न शकत।
परी शेषाचार्य जात । चरण धरती स्वामींचे ॥६०॥
नरसप्पा सुतार । तोही एक लीला सहचर ।
त्याचे घरी वारंवार । जावोनी राहती श्री स्वामी ॥६१॥
कलौ श्रीपाद श्रीवल्लभ । तेची एक स्वामी समर्थ ।
कर्दळीवनातूनी निघत । समर्थ स्वामी सद्‍गुरु ॥६३॥
कोणी पुसता म्हणत । मी असे श्री दत्त ।
नॄसिंहभान नाम असत । ऐसे सांगती तयालागी ॥६४॥
कधी म्हणती दत्तनगर । मूळपुरुष वडाचे झाड ।
आकाशात पतितं तोयं । ऐसे म्हणती कधी कधी ॥६५॥
ऐसा स्वामी समर्थ । सदेह परब्रह्म दत्त ।
अक्कलकोटी राहत । भक्तोध्दारा कारणे ॥६६॥।
त्याच्या लीला अनंत । कथा त्याच्या अनंत ।
चमत्कार त्याचे अनंत । कोणी कैसे वर्णावे ॥६७॥
समर्थ सप्तशती ग्रंथ । दावी लीला संकेत ।
दत्तावधूत आपुले चित्त । समर्थ कोणी वाहतसे ॥६८॥
स्वस्ती समर्थ सप्तशती । श्री स्वामींची वाड्मय मूर्ती ।
अक्षररुपे त्रैमूर्ती । साकार येथे होत असे ॥६९॥
समर्थ सप्तशती ग्रंथ । येथे पाहा पूर्ण होत ।
भाविकांचे मनोरथ । पूर्ण होती निश्चये ॥७०॥
॥ अध्याय दहावा ॥ ॥ ओवी संख्या ७०॥
॥ इति श्री स्वामी समर्थ सप्तशती ग्रंथ समाप्त ॥
॥ एकूण ओवी संख्या ७००॥

Explore More