Shree Swami Samarth

श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 8

(Shri Swami Samarth Saptashati Adhyay 8)

Also known as Swami Samarth Saptashati · Swami Samarth Saptashati adhyay 8 · Shri Swami Samarth Saptashati 8

Shri Swami Samarth Saptashati Adhyay 8. The Shri Swami Samarth Saptashati, seven hundred verses on Shri Swami Samarth of Akkalkot, arranged for parayana. It is read through in ten adhyays, commonly across a week, by those who keep the Swami's worship.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 71
श्री गणेशाय नमः ।
ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ।
श्री ब्रह्मचैतन्य । गोंदवलेकर महाराज ।
नववे वर्षी घेत । आशीर्वाद समर्थांचा ॥१॥
रामकृष्ण परमहंस । स्वामी दर्शन देती त्यांस ।
ब्रह्मचारी लोकनाथांस । सिध्दपदी बैसविले ॥२॥
विष्णुबुवा ब्रह्मचारी ।वृत्ती ब्रह्मतदाकारी ।
श्री समर्थ लीलाधारी । नाना लीला करिती ते ॥३॥
काळबुवा पुण्यात । साटम सावंतवाडीत ।
रांगोळी महाराज वेंगुर्ल्यात । ऐसे शिष्य तयांचे हो ॥४॥
ताजुद्दीनबाबा नागपुरात । साईबाबा शिर्डीत ।
सीतारामबाबा खर्डीत । ऐसे शिष्य तयांचे हो ॥५॥
ऐसा स्वामी समर्थ । सदैव राही लीला करीत ।
तयांचे चरित्र अद्‍भुत । कोणी कैसे वर्णावे ॥६॥
गोविंदराव नामे भक्त । असे व्याधीने पीडित ।
गाणगापुरी सेवा करीत । होता पाहा तेधवा ॥७॥
त्यासी दृष्टांत होत । जावे अक्कलकोटात ।
स्वामी समर्थ श्री दत्त । कलियुगी पाहा अवतरले ॥८॥
ऐसा होई दृष्टांत । मग येई अक्कलकोटात ।
कृपा स्वामींची होत । व्याधी जाई निघोनिया ॥९॥
मल्हारराव गायकवाड । बडोद्याचा राजा असत ।
श्री स्वामीसी विनवीत । यावे बडोद्यासी म्हणोनिया ॥१०॥
स्वामी काही न बोलत । राजा दानधर्म करीत ।
सुवर्ण रौप्य अर्पित । प्रसन्न करण्या स्वामींसी ॥११॥
प्रयन्त करी बहुत । परी स्वामी न जात ।
निराश होऊनी परतत । बडोद्यासी माघारा ॥१२॥
जाऊनी दरबार भरवीत । विडा तेथे ठेवीत ।
म्हणे जो कोणी स्वामींसी आणीत । त्यासी जहागीर देईन मी ॥१३॥
एक विडा उचलीत । म्हणे मी स्वामींसी आणीत ।
ऐसे म्हणोनी येत। अक्कलकोटा माझारी ॥१४॥
येऊनी अक्कलकोटात । स्वामीसी धन अर्पित ।
सेवका अन्नदान करीत । प्रसन्न करण्या स्वामींना ॥१५॥
मग हळूच पुसत । चला म्हणे बडोद्यात ।
स्वामी काही न बोलत । उगेच राहती बैसोनिया ॥१६॥
एक महिना राहत । प्रयत्न करी बहुत ।
अंति निराश होत । जाई परतोनी माघारा ॥१७॥
ऐसे अनेक दरबारी । करिती अक्कलकोटी वारी ।
बडोद्यास न्यावे अंतरी । हेतू धरोनी येती ते ॥१८॥
प्रतिवर्षी प्रयत्न करीत । विडा उचलोनी येत ।
अंति निराश होत । ऐसे पाहा होतसे ॥१९॥
राजा दरबार भरवीत । आणि विडा ठेवीत ।
सर्व दरबार्‍यांसी म्हणत । श्रोते तुम्ही अवधारा ॥२०॥
स्वामी समर्थ भगवान । येथे आणावे म्हणोन ।
बहुत वर्षे प्रयत्न करोन । निराश आम्ही जाहलो ॥२१॥
जो कोणी समर्थांस । घेऊन येईल बडोद्यास ।
मोठी जहागिरी त्यास । देऊ आम्ही निश्चये ॥२२॥
ऐसे जाहीर करत । तात्यासाहेब उठत ।
मी आणतो समर्थांस । म्हणोनी विडा उचलला ॥२३॥
राजासी आनंद होत । द्रव्य देई बहुत ।
अक्कलकोटासी पाठवीत । लव्याजम्यासहित हो ॥२४॥
तात्यासाहेब अक्कलकोटासी येत । सेवकासी अन्न वस्त्र देत ।
चोळाप्पासी द्रव्य देत । सुंदराबाईसी तैसेची ॥२५॥
सेवका ऐसे वश करीत । सर्व सेवक स्वामींसी म्हणत ।
तात्यासाहेब खरा भक्त । जाऊ आपण बडोद्याला ॥२६॥
करावया स्वामीसी प्रसन्न । नित्य करी अन्नदान ।
गरिबांसी वस्त्रदान । स्वामी हस्ते करीत असे ॥२७॥
चार मास ऐसे चालत । परी स्वामी न काही बोलत ।
म्हणोनी चोळाप्पासी म्हणत । तात्यासाहेब अवधारा ॥२८॥
स्वामींसी घेऊनी सांगात । जर बडोद्यासी तुम्ही चलत ।
जहागिरी देईन तुम्हाप्रत । दहा हजार रुपयांची ॥२९॥
ऐकोनी ऐसी मात । चोळाप्पासी लोभ सुटत ।
येवोनिया स्वामीप्रत । हात जोडोनी विनवितो ॥३०॥
स्वामी तुम्ही बडोदा चलत । मज मोठी जहागिरी मिळत ।
ऐकोनी स्वामी म्हणत । नाही भक्ती तेथवरी ॥३१॥
भक्ती नसता भगवंत । कैसा जाईल तेथ ।
ऐकोनी निराश होत । तात्यासाहेब तेथवरी ॥३२॥
तात्या आणि सर्व भक्त । बैसोनी विचार करीत ।
श्री स्वामींसी बडोद्यास । न्यावे कैसे उचलोनी ॥३३॥
सर्व मिळोनी ठरवीत । स्पेशल ट्रेन करावी म्हणत ।
स्वामींसी घालोनी मेण्यात । ट्रेनमध्ये ठेवावे ॥३४॥
ऐसे करिता अकस्मात । स्वामी काही करु न शकत ।
ट्रेन सरळ थांबत । बडोद्यासी जाऊनिया ॥३५॥
ऐसा विचार ठरवत । भाडयाने रेल्वे ठरवत ।
स्वामींनी बैसावे मेण्यात । म्हणोनी प्रार्थिती स्वामींना ॥३६॥
स्वामी चला राजवाड्यात । चला स्वामी खास बागेत ।
स्वामींनी बसावे मेण्यात । म्हणोनी पाहा ते विनविती ॥३७॥
परी स्वामी टाळत । न बैसती पालखीत ।
ऐसे चार दिवस जात । काय करावे कळेना ॥३८॥
एकदा बैसता पालखीत । नेऊ रेल्वे स्टेशनात ।
ऐसा विचार करीत । सेवक तेथे बैसले ॥३९॥
चोळाप्पा स्वामींसी विनवीत । बाळाप्पाही स्वामींसी म्हणत ।
सुंदराबाईही सांगत । बसा पालखीत म्हणोनिया ॥४०॥
ऐसे गेले चार दिवस । काय आले समर्थ मनास ।
जाऊनी बसले पालखीत । भक्त उचलती पालखी ॥४१॥
पालखी उचलोनी त्वरित । पळत रेल्वे स्टेशन गाठत ।
स्टेशन जव जवळ येत । मेणा हलका लागतसे ॥४२॥
म्हणूनी भूमिवरी ठेवीत । पडदा उघडोनी पाहत ।
स्वामी अदृश्य होत । पाहोनी विस्मय सर्वांना ॥४३॥
अदृश्य होऊनी समर्थ । कोठे गेले न कळत ।
म्हणोनी सर्व दुःख करीत । काय करावे कळेना ॥४४॥
एक पोस्टमन इतक्यात । जेऊर गावाहूनी येत ।
तो सांगे सेवकाप्रत । स्वामी तिकडे आहे ती ॥४५॥
येथोनी दोन मैलांवर । जेऊर गावच्या वाटॆवर ।
समर्थ एका शिळेवर । बैसलेले पाहिले मी ॥४६॥
ऐसे भक्ता सांगत । भक्त जाती धावत ।
पाहोनी स्वामींसी तेथ । क्षमा मागती सर्वही ॥४७॥
बैसवोनिया पालखीत । अक्कलकोटासी आणीत ।
तात्यासाहेब बडोद्यास । निराश होवोनी जातसे ॥४८॥
अनेक ऐसे प्रयत्न करीत । परी स्वामी बडोद्यास न जात ।
ऐसा स्वामी समर्थ । राजासही मानीना ॥४९॥
दरबारी यशवंतराव । त्यासी पाठवी मल्हारराव ।
बडोद्यासी चलावे । म्हणोनी प्रार्थी स्वामींना ॥५०॥
त्यासी पाहता क्रोधित । होती समर्थ अकस्मात ।
‘बेड्या ठोका ’ म्हणत । समर्थ तेव्हा जोराने ॥५१॥
तिसरे दिवशी हूकूम येत । जाई बडोद्यासी परत ।
‘ बेड्या हाती पडत । शिक्षा त्यासी होतसे ॥५२॥
ऐसा स्वामी समर्थ । सद्‍भक्ता हवे ते देत ।
मग्रुरा दंड करीत । ऐसा महिमा तयाचा ॥५३॥
वटवृक्ष नव्हे कल्पवृक्ष । आजही तेथे साक्ष देत ।
परब्रम्ह दत्त प्रत्यक्ष । अक्कलकोटात राहिला ॥५४॥
दत्तात्रेयाचे दर्शनार्थ । एक साधू तप करीत ।
द्त्त तयासी सांगत । अक्कलकोटात आहे मी ॥५५॥
ऐसा आदेश होता प्राप्त । साधू निघाला चालत ।
बहुत प्रवास करीत । अक्कलकोटी पोचला ॥५६॥
येता साधू दर्शनार्थ । स्वामी उभे राहत ।
तीन शिरे सहा हात । दर्शन देती तयाला ॥५७॥
पूर्णब्रह्म दत्तात्रेय । ऐसे स्वामींचे स्वरुप होय ।
साधू होई तन्मय । पाहोनी लीला स्वामींची ॥५८॥
जन्मांध सूरदास भक्त । होता व्दारकेत राहत ।
श्री स्वामी समर्थ । दर्शन देती तयालागी ॥५९॥
तयासी दिव्यदृष्टी देत । मीच कृष्ण म्हणोनी सांगत ।
सदेहाने सांप्रत । अक्कलकोटी आहे मी ॥६०॥
भुर्‍याबुवा व्दारकेत । द्त्त दर्शनार्थ तप करीत ।
स्वामी समर्थ दर्शन देत । एके दिनी तयालागी ॥६१॥
मस्तकी वरदहस्त ठेवीत । बुवा होती समाधिस्थ ।
ऐसी लीला अद्‍भुत । करिती समर्थ श्री स्वामी ॥६२॥
भुर्‍याबुवा गुजराथेत । समर्थांचा प्रचार करीत ।
लोक येती दर्शनार्थ । दूरदुरोनी स्वामीच्या ॥६३॥
ऐसा स्वामी समर्थ । ज्या जे हवे ते ते देत ।
कल्पवृक्ष तेथे असत । अक्कलकोटा माझारी ॥६४॥
कुलकर्णी नामे दत्तभक्त । उदरव्यथेने असे पीडित ।
गाणगापुरी मास सात । सेवा करीत राहिला ॥६५॥
त्यासी होई दृष्टांत । जरी परब्रह्म भेटत ।
व्याधी जाईल निश्वित । परब्रह्माच्या दर्शनाने ॥६६॥
होऊनिया जागृत । म्हणे परब्रह्म कोठे राहत ।
जे योग्यांसीही न भेटत । मजला कैसे भेटावे ॥६७॥
पुन्हा दृष्टांत होत । अक्कलकोटा जावे म्हणत ।
तेथे परब्रह्म साक्षात । स्वामी रुपे राहतसे ॥६८॥
अक्कलकोटा येई भक्त । पाहे परब्रह्म साक्षात ।
तत्‍क्षणी होई व्याधी मुक्त । ऐसा महिमा स्वामींचा ॥६९॥
त्याच्या लीला अनंत । कथा त्यांच्या अनंत ।
महिमा त्यांचा अनंत । कोणी कैसा वर्णावा ॥७०॥
॥ अध्याय आठवा ॥ ॥ओवी संख्या ७०॥

Explore More