Lord Dattatreya

श्री सप्तशती गुरुचरित्र अध्याय 42

(Saptashati Gurucharitra Adhyay 42)

Vasudevananda Saraswati

Also known as Saptashati Gurucharitra · Saptashati Gurucharitra 42 · Saptashati Gurucharitra in Marathi

Saptashati Gurucharitra Adhyay 42. The Saptashati Gurucharitra of Vasudevananda Saraswati (Tembe Swami), a condensation of the Gurucharitra into seven hundred verses. It carries the same account of Shripad Shrivallabha and Nrisimha Saraswati in a shorter compass, for those who keep a daily parayana rather than a seven-day one. This adhyay is named in its colophon for काशीयात्रानिरुपणं.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

तत्र स्थोदङ्‌मानसयात्रा । करीं पंचक्रोशीयात्रा ।
शुक्लकृष्णपक्षयात्रा । नित्ययात्रा करी भावे ॥१॥
प्रत्यक्षचि विश्वेश्वरा । भवानी हरिधुंडीश्वरा ।
दंडपाणी भैरववीरा । विघ्नेश्वरा गुहा देखी ॥२॥
तूं स्थीर चित्तें करीं यात्रा । स्थापी लिंग तूं कुमारा ।
सुटतील येरझारा । असें म्हणोनी गुप्त झाला ॥३॥
बाळ उठोनी पहात । त्या न दिसे, झाला गुप्त ।
हाची माझा गुरु म्हणत । करीतसें तो यात्रा ॥४॥
अवाच्य हो शिवलीला । इष्ट वर दे तयाला ।
दे तो तसें गुर्वादिकांला । तो झाला विश्वकर्मा ॥५॥
द्विज तेव्हां गुरु जसें । सांगे तें ते पाहे तसे ।
गुरुनाथा वंदितसे । स्तवितसे सायंदेव ॥६॥
तूंची उमापती होसी । मज दाविली येथ काशी ।
गुरु म्हणें त्वद्वंशासी । एकविंशी घडे यात्रा ॥७॥
तूं सत्तम लोकी होसी । आतां न सेंवीं म्लेच्छासी ।
आणूनिया स्त्रीपुत्रांसी । आम्हापाशीं रहासेवित ॥८॥
तो नमःस्कारुनी गेला । स्वकुटुंबा घेऊनि आला ।
स्तवि पुनः श्रीगुरुला । कानदीस्तोत्रालापें ॥९॥
त्याचा पुत्रा नागनाथ । तया वर दे गुरुनाथ ।
सांगे सांयदेवा स्वस्थ । करी अनंतव्रत आजी ॥१०॥
इति श्री०प०प०वा०स०वि सारे काशीयात्रानिरुपणं नाम द्विचत्वारिंशो०

Explore More