Sai Baba of Shirdi

शिर्डी साई बाबा प्रातःकाल आरति - काकड आरति

(Shirdi Sai Baba Kakad Aarti)

Traditional

Also known as pratahkalaca upasanakrama pahate vajata

The Kakad Aarti is the first devotional prayer performed at dawn at the Shirdi Sai Baba Temple, signifying the ritual waking of the deity. Composed in Marathi, this soul-stirring composition is steeped in deep surrender and devotion, inviting the grace of the Sadguru into the seeker's life. By chanting or listening to these verses, devotees seek to cleanse their consciousness and begin their day with spiritual clarity. The Aarti serves as a powerful medium for connecting with Sai Baba, fostering inner peace, removing ignorance, and invoking the divine protection of the master throughout the day.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

॥ कांकड आरती ॥
प्रातःकाळचा उपासनाक्रम (पहाटे ४.३० वाजता)
(१) भूपाळी

जोडूनियां कर चरणीं ठेविला माथा ।
परिसावी विनंती माझी सद्गुरूनाथा ॥ १ ॥

असो नसो भाव आलों तुझिया ठाया ।
कृपादृष्टीं पाहें मजकडे सद्गुरूराया ॥ २ ॥

अखंडित असावें ऐसे वाटतें पायीं ।
सांडूनी संकोच ठाव थोडासा देईं ॥ ३ ॥

तुका म्हणे देवा माझी वेडीवांकुडी ।
नामें भवपाश हातीं आपुल्या तोडी ॥ ४ ॥
(२) भूपाळी

उठा पांडुरंगा आता प्रभातसमयो पातला ।
वैष्णवांचा मेळा गरूडपारीं दाटला ॥ १ ॥

गरूडपारापासुनी महाद्वारापर्यंत ।
सुरवरांची मांदी उभी जोडूनिया हात ॥ २ ॥

शुकसनकादिक नारद-तुंबर भक्तांच्या कोटी ।
त्रिशूल डमरू घेऊनि उभा गिरिजेचा पती ॥ ३ ॥

कलीयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी ।
पाठीमागें उभी डोळा लावुनियां जनी ॥ ४ ॥
(३) भूपाळी
(चाल – घनःश्यामसुंदरा श्रीधरा)

उठा उठा श्री साईनाथ गुरू चरणकमल दावा ।
आधिव्याधि भवताप वारुनी तारा जडजीवा ॥ धृ० ॥

गेली तुम्हां सोडुनियां भवतमरजनी विलया ।
परि ही अज्ञानासी तुमची भुलवि योगमाया ।
शक्ति न आम्हां यत्किंचितही तिजला साराया ।
तुम्हींच तीतें सारुनि दावा मुख जन ताराया ॥ चा० ॥

भो साईनाथ महाराज भवतिमिरनाशक रवी ।
अज्ञानी आम्ही किती तव वर्णावी थोरवी ।
ती वर्णितां भागले बहुवदनि शेष विधि कवी ॥ चा० ॥
सकृप होउनि महिमा तुमचा तुम्हींच वदवावा ॥
आधि० ॥ उठा० ॥ १ ॥

भक्त मनीं सद्भाव धरूनि जे तुम्हां अनुसरले ।
घ्यायास्तव ते दर्शन तुमचें द्वारीं उभे ठेले ।
ध्यानस्था तुम्हांस पाहुनी मन अमुचें धाले ।
परि त्वद्वचनामृत प्राशायातें आतुर झाले ॥ चा० ॥

उघडूनी नेत्रकमला दीनबंधु रमाकांता ।
पाहिं बा कृपादृष्टीं बालका जशी माता ।
रंजवी मधुरवाणी हरीं ताप साईनाथ ॥ चा० ॥
आम्हींच अपुले काजास्तव तुज कष्टवितो देवा ।
सहन करीशी ऐकुनी द्यावी भेट कृष्ण धावां ॥
उठा उठा० ॥ आधिव्याधि० ॥ २ ॥
(४) भूपाळी

उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां ।
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ॥ १ ॥

संत साधू मुनी अवघे झालेती गोळा ।
सोडा शेजे सुखे आतां बघुं द्या मुखकमला ॥ २ ॥

रंगमंडपी महाद्वारीं झालीसे दाटी ।
मन उतावील रूप पहावया दृष्टी ॥ ३ ॥

राही रखुमाबाई तुम्हां येऊं द्या दया ।
शेजे हालवूनी जागें करा देवराया ॥ ४ ॥

गरूड हनुमंत उभे पाहती वाट ।
स्वर्गींचे सुरवर घेऊनि आले बोभाट ॥ ५ ॥

झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा ।
विष्णुदास नामा उभा घेऊनि कांकडा ॥ ६ ॥
(५) अभंग

घेउनियां पंचारती । करूं बाबांसी आरती ॥
करूं साईसी० ॥ १ ॥

उठा उठा हो बांधव । ओंवाळूं हा रमाधव ॥
साई र० ॥ ओं० ॥ २ ॥

करूनिया स्थिर मन । पाहूं गंभीर हें ध्यान ॥
साईंचे हें० ॥ पा० ॥ ३ ॥

कृष्णनाथा दत्तसाई । जडो चित्त तुझे पायी ॥
साई तु० ॥ जडो० ॥ ४ ॥
(६) कांकड आरती

कांकड आरती करीतों साईनाथ देवा ।
चिन्मयरूप दाखवीं घेउनि बालक-लघुसेवा ॥ धृ० ॥

काम क्रोध मद मत्सर आटुनी कांकडा केला ।
वैराग्याचे तूप घालुनि मी तो भिजविला ।
साईनाथगुरूभक्तिज्वलनें तो मी पेटविला ।
तद्वृत्ती जाळूनी गुरूनें प्रकाश पाडीला ।
द्वैत-तमा नासूनी मिळवी तत्स्वरूपीं जीवा ॥ चि० ॥ १ ॥

भू-खेचर व्यापूनी अवघे हत्कमलीं राहसी ।
तोचि दत्तदेव शिरडी राहुनी पावसी ।
राहुनी येथे अन्यत्रहि तू भक्तांस्तव धावसी ।
निरसुनिया संकटा दासा अनुभव दाविसी ।
न कळे त्वल्लीलाही कोण्या देवा वा मानवा ॥ चि० ॥ २ ॥

त्वद्यशदुदुंभीने सारे अंबर हें कोंदलें ।
सगुण मूर्ति पाहण्या आतुर जन शिरडी आले ।
प्राशुनी त्वद्वचनामृत अमुचे देहभान हरपलें ।
सोडूनियां दुरभिमान मानस त्वच्चरणीं वाहिले ।
कृपा करूनियां साईमाउले दास पदरीं घ्यावा ॥
चि० ॥ का० ॥ चि० ॥ ३ ॥
(७) कांकड आरती

भक्तिचिया पोटीं बोध कांकडा ज्योती ।
पंचप्राण जीवेंभावे ओवाळूं आरती ॥ १ ॥

ओवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडोनी चरणीं ठेविला माथा ॥ धृ० ॥

काय महिमा वर्णूं आतां सांगणे किती ।
कोटी ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ॥ २ ॥

राई रखुमाबाई उभ्या दोघी दो बाहीं ।
मयुरपिच्छ चामरें ढाळिति ठायीं ठायी ॥ ३ ॥

तुका म्हणे दीप घेउनि उन्मनींत शोभा ।
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥ ४ ॥ ओवाळूं० ॥
(८) पद (उठा उठा)

उठा साधुसंत साधा आपुलालें हित ।
जाईल जाईल हा नरदेह मग कैंचा भगवंत ॥ १ ॥

उठोनियां पहाटें बाबा उभा असे विटे ।
चरण तयांचे गोमटे अमृतदृष्टी अवलोका ॥ २ ॥

उठा उठा हो वेगेंसीं चला जाऊंया राउळासी ।
जळतील पातकांच्या राशी कांकड आरती देखिलिया ॥ ३ ॥

जागें करा रूक्मिणीवर, देव आहे निजसुरांत ।
वेगें लिंबलोण करा दृष्ट होईल तयासी ॥ ४ ॥

दारीं वाजंत्री वाजती ढोल दमामे गर्जती ।
होते कांकड आरती माझ्या सद्गुरूरायांची ॥ ५ ॥

सिंहनाद शंखभेरी आनंद होतसें महाद्वारीं ।
केशवराज विटेवरी नामा चरण वंदितो ॥ ६ ॥

भजन
साईनाथगुरू माझे आई । मजला ठाव द्यावा पायीं ॥
दत्तराज गुरू माझे आई । मजला ठाव द्यावा पायीं ॥
श्रीसच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ।
(९) श्री साईनाथप्रभातष्टक
(पृथ्वी)

प्रभातसमयीं नभा शुभ रविप्रभा फांकली ।
स्मरे गुरु सदा अशा समयिं त्या छळे ना कली ॥
म्हणोनि कर जोडुनी करूं आता गुरुप्रार्थना ।
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना ॥ १ ॥

तमा निरसि भानु हा गुरुहि नासि अज्ञानता ।
परंतु गुरुचीच करी न रविहि कधीं साम्यता ॥
पुन्हा तिमिर जन्म घे गुरुकृपेनि अज्ञान हा ।
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना ॥ २ ॥

रवि प्रगट होउनि त्वरित घालवी आळसा ।
तसा गुरुहि सोडवी सकल दुष्कृतीपासुनी ॥
हरोनि अभिमानही जडवि तत्पदीं भावना ।
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना ॥ ३ ॥

गुरुसि उपमा दिसे विधिहरीहरांची उणी ।
कुठोनि मग येइ ती कवि नवा उगी पाहुणी ॥
तुझीच उपमा तुला बरवि शोभते सज्जना ।
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना ॥ ४ ॥

समाधि उतरोनियां गुरु चला मशिदीकडे ।
त्वदीय वचनोक्ति ती मधुर वारिती सांकडें ॥
अजातरिपु सद्गुरु अखिलपातकां भंजना ।
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना ॥ ५ ॥

अहा सुसमयासि या गुरु उठोनियां बैसले ।
विलोकुनि पदाश्रिता तदिय आपदे नासिलें ॥
असा सुहितकारि या जगतिं कोणिही अन्य ना ।
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना ॥ ६ ॥

असे बहुत शाहणा परि न या गुरुची कृपा ।
न तत्त्वहित त्या कळे करितसे रिकाम्या गपा ॥
जरी गुरुपदा धरी सुदृढ भक्तिनें तो मना ।
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना ॥ ७ ॥

गुरो विनति मी करीं हृदयमंदिरीं या बसा ।
समस्त जग हें गुरुस्वरूपचि ठसो मानसा ॥
घडो सतत सत्कृती मतिहि दे जगत्पावना ।
समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना ॥ ८ ॥

खद्धरा
प्रेमें या अष्टकासी पढुनि गुरुवरा प्रार्थिती जे प्रभातीं ।
त्यांचे चित्तासि देतो अखिल हरुनियां भ्रांति
मी नित्य शांति ॥
ऐसें हें साईनाथें कथुनि सुचविलें जेंवि या बालकासी ।
तेंवि त्या कृष्णपायीं नमुनि सविनयें अर्पितों
अष्टकासी ॥ ९ ॥
(१०) पद

साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना ॥ धृ० ॥

जाना तुमने जगतपसारा, सबही झूठ जमाना ॥
साई० ॥ १ ॥

मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझको चरण दिखलाना ॥
साई० ॥ २ ॥

दास गनू कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना ॥
साई० ॥ ३ ॥
(११) पद

रहम नजर करो, अब मोरे साईं,
तुमबिन नहीं मुझे मां-बापभाई ॥ धृ० ॥

मैं अंधा हूं बंदा तुम्हारा ।
मैं ना जानूं, अल्लाइलाही ॥ रहम० ॥ १ ॥

खाली जमाना मैंने गमाया ।
साथी आखिरी तू और न कोई ॥ रहम० ॥ २ ॥

अपने मशीद का झाडू गनू है ।
मालिक हमारे, तुम बाबा साईं ॥ रहम० ॥ ३ ॥
(१२) पद

तुज काय देऊं सावळ्या मी खाया तरी ।
मी दुबळी बटिक नाम्याची जाण श्रीहरी ।
उच्छिष्ट तुला देणें ही गोष्ट ना बरी ।
तूं जगन्नाथ, तुज देऊं कशी रे भाकरी ।

नको अंत मदीय पाहूं सख्या भगवंता । श्रीकांता ।
मध्यान्हरात्र उलटोनि गेली ही आतां । आण चित्ता ।
जा होईल तुझा रे कांकडा कीं राउळांतरीं ।
आणतील भक्त नैवद्यहि नानापरी ॥
(१३) पद

श्रीमद्गुरू बाबासाई तुजयांचुनि आश्रय नाहीं,
भूतलीं ॥ धृ० ॥

मी पापी पतित धीमंदा ।
तारणें मला गुरूनाथा, झडकारी ॥ १ ॥

तूं शांतिक्षमेचा मेरू ।
तूं भवार्णवींचें तारूं, गुरूवरा ॥ २ ॥

गुरूवरा मजसि पामरा, अतां उद्धरा, त्वरित लवलाही,
मी बुडतो भवभय डोहीं उद्धरा ॥
श्रीमद्गुरू० ॥ ३ ॥
ॐ राजाधिराज योगिराज परब्रह्म
"श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज"

Also Chanted For

Daily Practice

Explore More