अल्पायुषी सत्यवंत। सावित्रीनें का प्रणीला॥
आणखी वर वरी बाळे। मनीं निश्चय जो केला॥
आरती वडराजा॥१॥
भावे करीन मी पूजा। आरती वडराजा॥
ज्येष्ठामास त्रयोदशी। करिती पूजन वडाशीं॥
त्रिरात्र व्रत करूनीया। जिंकी तूं सत्यवंताशी॥२॥
धर्मराजा उचकला। हत्या घालील जीवाला॥
येई ग पतिव्रते। पती नेई गे आपुला॥३॥
चारी वर देऊनियां। दयावंता द्यावा पती॥४॥
तुझें व्रतें आचरती। तुझी भुवनें पावती॥५॥
स्वर्गी पुष्पवृष्टी। करुनियां आणिलासी आपुला पती॥
अभय देऊनियां। पतिव्रते तारी त्यासी॥६॥
