दंतासुर मर्दानी केले चरित्र। सिद्धांचे स्थळ तें महापवित्र॥१॥
साधका सिद्धी वाणेच्या तीरीं। तेथील महिमा वर्णूं न शके वैखरी॥२॥
मूळ पीठ रेणागिरी नांदे आपण। संताचे माहेर गोदेवी स्थान॥३॥
नागझरी तीर्थ तीर्थांचे सार। मार्जन करिता दोष होती संहार॥४॥
व्यापक सकळां देहीं अनंत गुण भरिते। निळकंठ ओवाळू कैवल्य माते॥५॥
