भक्तसंकटीं नाना स्वरूपीं स्थापिसी स्वधर्म॥
अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी।
वेद नेले चोरूनी ब्रह्मा आणुनियां देसी॥
मत्स्यरूपी नारायण सप्तही सागर धुंडीसी।
हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी॥१॥
परोपकारासाठीं देवा कांसव झालासी॥
दाढें धरूनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी।
प्रल्हादाकारणें स्तंभीं नरहरि गुरगुरसी॥२॥
भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळीं नेसी॥
सर्व समर्पण केलें म्हणउनि प्रसन्न त्या होसी।
वामनरूप धरूनी बळिच्याद्वारीं तिष्ठसी॥३॥
कष्टीं ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला॥
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला।
सहावा अवतार परशुराम प्रगटला॥४॥
तेहतीस कोटी देव बंदीं हरलें सीतेला॥
पितृवचनालागीं रामें वनवास केला।
मिळोनी वानर सहित राजाराम प्रगटला॥५॥
नंदाघरीं जाउन निजसुख गोकुळा दिधलें॥
गोरसचोरी करीतां नवलक्ष गोपाळ मिळविले।
गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले॥६॥
अधर्म हा अवघा।
सांडुनि नित्यधर्म सोडुनि नंदाची सेवा॥
म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनि कलंकी केशवा।
बहिरवि जान्हवि द्यावि निजसुखानंदसेवा॥७॥
