तारक तू सकळांचा जिवलग सोयरा॥
अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धि हरविली॥
वैराग्याची निष्ठा प्रगटुनि दाखविली।
अहंममता दवडुनि निजशान्ती वरिली॥१॥
विरक्त ज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला॥
जगदुद्धारालागीं उपाय सुचविला।
निंदक दुर्जनाचा संदेह निरसीला॥२॥
कोरड्याचि काढुनि दाखविल्या शेखी॥
अपार कविताशक्ति मिणवुनि इहलोकीं।
कीर्तन श्रवणें तुमच्या उद्धरति जन लोकीं॥३॥
विधि जनिता तोचि आठव हा दीधला॥
तेणें ब्रह्मानन्दे प्रेमा डोलविला।
न तुके म्हणोनि तुका नामीं गौरविला॥४॥
कळिच्या काळामाजी अद्भुत वर्तविलें॥
मानव देह घेऊनि निजधामा गेले।
निळा म्हणे सकळ संत तोषविले॥५॥
