पावन करि मज सत्वर विश्वाचे आई॥
हरिसी पातक अवघे जग पावन करिसी॥
दुष्कर्मी मी रचिल्या पापांच्या राशी।
हर हर आतां स्मरतों मति होईल कैसी॥१॥
विषयांचे मोहानें त्यातचि रत झालों॥
त्याचे योगे दुष्कृत सिंधूत बुडालों।
त्यांतुनि मजला तारिसि ह्या हेतूनें आलों॥२॥
क्षाळीं यमधर्माच्या खात्यातील बाकी॥
मत्संगति जन अवघे तारियले त्वां की।
उरलो पाहें एकचि मी पतितांपैकी॥३॥
नोपेक्षी मज आतां त्वत्पात्रीं घ्यावें॥
केला पदर पुढे मी मज इतकें द्यावें।
जीवे त्या विष्णूच्या परमात्मनि व्हावें॥४॥
