सिंदुरमंडित विशाळ सरळ भुजदंडा॥
उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलीला॥
रुणझुण करिती घागरिया घोळा।
सतार सुस्वर गायन शोभित अवलीला॥१॥
धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा॥
तातक् तातक् थैय्या करिसि आनंदा।
ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा॥२॥
परशांकुशलड्डूधर शोभित शुभवदना॥
ऊर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना।
मुक्तेश्वर चरणांबुजिं अलिपरि करी भ्रमणा॥३॥
