Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 28

(Purushottam Maas Katha Adhyay 28)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 28

Purushottam Maas Katha Adhyay 28. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 174
श्री गणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरवे नमः ॥
जयजयाजी करुणामूर्ती ॥ विश्वंभरा विश्वस्फूर्ती ॥
करुणासमुद्रा कृपामुर्ती ॥ निवारीं अधोगती पैं माझी ॥ १ ॥
मी तंव अनाथदीन ॥ प्रार्थितों करुणावचन ॥
दयाळुवा कृपाघन ॥ रक्षावे कृपेनें दासातें ॥ २ ॥
मलमाहात्म्य अति पावन ॥ ऐकोत श्रोते भाविक जन ॥
लक्ष्मीनारायण संवाद पूर्ण ॥ परिसा सज्जन आदरें ॥ ३ ॥
लक्ष्मीरुवाच ॥
देव देव ऋषीकेश भक्‍तानामभयप्रद स्त्रीणां ॥
केनोपचारेण तुष्टोसि त्वं जनार्दन ॥ १ ॥
लक्ष्मी वदे हो जनार्दना ॥ भक्तप्रतिपाळ अघहरणा ॥
परिसा माझी विज्ञापना ॥ हे नारायणा करुणासिंधो ॥ ४ ॥
तरी स्त्रियांनीं काय करावें ॥ कवण व्रत आचरावें ॥
केवीं मोक्षातें पावावें ॥ देवदेवा सांगावें सर्वही ॥ ५ ॥
स्त्री देहाची आकृती असे जाण ॥ शरीरीं अमंगळता पूर्ण ॥
हरेल कैसें तें कृपाकरून ॥ वदावें जाण स्वामियां ॥ ६ ॥
दुःशीलोर्दुभगोवृद्धो जडोरोगयुतोपिवा ॥
पतिःस्त्रीभिर्नहातव्योलोकेप्सुभिरपातकी ॥ २ ॥
मलीनता प्राप्त झालिया देहीं ॥ स्पर्श न करिती कोणीहीं ॥
जयाच्या कुशी जन्मे देहीं ॥ ते तंव पाई न स्पर्शती ॥ ७ ॥
देवब्राह्मण आणि अग्नि ॥ हे साक्षी ठेऊन पिता अर्पि दानीं ॥
दान घेतलें तोचि भ्रतारधनी ॥ परि देहा लागुनी स्पर्शेना ॥ ८ ॥
ऐसें ऐकूनिया उत्तर ॥ बोलता जाला सर्वेश्वर ॥
श्रृणु सुंदरी ये सोपस्कार ॥ ऐकें उत्तर प्रश्नाचें ॥ ९ ॥
श्रीनारायण उवाच॥
नारीणां परमोधर्मो भर्तृसेवासमोनहि ॥
पतिशुश्रुषणादेवागताः स्वर्वीतकल्मषः ॥ ३ ॥
सकळ धर्मामाजी उत्तम धर्म जाण ॥ स्त्रियांतें दैवत भ्रतारची पूर्ण ॥
तया वेगळें दैवत आन ॥ केलें साधन जन्मवरी ॥ १० ॥
जन्मवर साधन केलें ॥ शास्त्रपुराणें दैवत पूजिलें ॥
तें तितुकेंहि वाया गेलें ॥ जे नाचरले पतिआज्ञे पैं ॥ ११ ॥
जे पतिवचनातें न मानी ॥ वंचनार्थ करी पतिलागोनि ॥
अनृतसदां असत्यवचनी ॥ तरी निदानीं सुटेना ॥ १२ ॥
याव्यतिरिक्त अनंत पापराशी ॥ त्या हो घडती स्त्रियासीं ॥
काही सायासी किंवा अनयासीं ॥ तरी सुटका तियेसि असेना ॥ १३ ॥
म्हणोनि सर्वीसर्वेश्वर ॥ स्त्रियांते दैवत आपुला भ्रतार ॥
हा तंव वेदेची केला निर्धार ॥ आन विचार नसेची ॥ १४ ॥
पतीची आज्ञा तेचि मान्य ॥ तेंचि दैवत पतिव्रते लागून ॥
पतिवाचून इतर सर्व शीण ॥ नसे कारण अन्य कांहीं ॥ १५ ॥
पहा वाराणसी माजी जाण ॥ लोपामुद्रा पतिव्रता धन्य ॥
जियेचें नाम घेतां पूर्ण ॥ होय क्षाळण महापापा ॥ १६ ॥
ऐसिया धर्मे तेची पतिव्रता ॥ नाहीतरी इतरही कांता ॥
तयांची किंचित वार्ता ॥ तेही सर्वथा निवेदूं ॥ १७ ॥
भ्रतारें मागतां उदक ॥ येरी कूप दावीतसे देख ॥
म्हणे पात्र घेऊनी आणा सम्यक ॥ नाहीं उदक गृहामाजी ॥ १८ ॥
तत्रापि उदक असलिया कोडें ॥ पात्र आणुनि आपटी तयापुढें ॥
क्षुधानळें पीडिता निवाडें ॥ करी बडबड वाउगी ॥ १९ ॥
भलतेंचि करूनी निमित्य ॥ सक्रोधें अन्न पचवीत ॥
खारट आळणी म्हणता तेथ ॥ म्हणे करावे हस्तें आपुलिया ॥ २० ॥
जन्म गेला नाव ठेवितां ॥ रसनेची चवी का सया पाहिजे आतां ॥
कैसि या प्रकारें कीजे क्षुधाशांतता ॥ असे अवगत स्वभावहा ॥ २१ ॥
ऐसिया स्त्रियांतें तत्वतां ॥ त्या म्हणो नये ती पतिव्रता ॥
ऐसियेसी संसारकरितां ॥ जन्म वृथा प्राणियासी ॥ २२ ॥
तरी पतीव्रताधर्मरीती ॥ इतिहास वदे रमापती ॥
तेचि वदों श्रोतियांप्रती ॥ अनुपम्यस्थिती आगळी ॥ २३ ॥
तरी काश्मीरदेशी प्रबळ ॥ धर्मपुरी प्रख्यात प्रज्वळ ॥
तेथील विप्र एक परमसुशील ॥ नाम जाण धर्मशर्मा ॥ २४ ॥
स्नानसंध्याशीळ सत्पात्र ॥ धर्मपरायण अग्निहोत्र ॥
पोटीं नसे पुत्र आणुमात्र ॥ सत्पात्र तयाची ॥ २५ ॥
नामें जाणा ते सुशीळा ॥ पतिव्रता परम मंगळा ॥
उभयतां क्रमित काळा ॥ असे निर्मळा ह्रदयीची ॥ २६ ॥
वयसा उभयतांची समान ॥ साठिची जालीसे गणना ॥
तंव धर्मशर्मा बोले तिये लागून ॥ ऐक वचन भामिनिये ॥ २७ ॥
वसंत ऋतु उष्ण मास ॥ गंगेस चलावें स्नानास ॥
येरी अवश्य म्हणोन तयास ॥ निघती जाली तात्काळी ॥ २८ ॥
पाहूनि गंगोदक निर्मळ ॥ दुजें कोणी नसेचि अढळ ॥
जळी रिघूनियां ते वेळें ॥ स्नान करी तांतडी ॥ २९ ॥
परी बुद्धि कर्मानुसार ॥ ह्रदयीं उदेला कामविकार ॥
विप्र जाला कामातुर ॥ बोले उत्तर स्त्रियेतें ॥ ३० ॥
म्हणे नग्न जलक्रिडा करावी ॥ रति सुखातें विश्रांति द्यावी ॥
ऐसें वाटे माझ्या जीवीं ॥ तरीं आचरावी क्रिया हे ॥ ३१ ॥
तंव येरी वदतसे उत्तरा ॥ म्हणे हें केउतें उदेलें अंतरा ॥
माध्यान पातला भास्करा ॥ वरी गंगातीर हें पवित्र ॥ ३२ ॥
त्याही वय नसे आपुलें ॥ हे तों केवीं मनी उद्‍भवले ॥
मज तो वचन मोडितां नये वहिलें ॥ बोल लागेल पतिव्रतेसी ॥ ३३ ॥
तरी स्वगृहीं चला निधी ॥ मग सारावी हे विधि ॥
येरु म्हणे हें तो न घडे कधीं ॥ नाहीं अवघी कामातें ॥ ३४ ॥
ऐसें तियेतें वदोन ॥ जळक्रीडा करिती जाली नग्न ॥
द्रवो लागलें रेत पूर्ण ॥ ह्रदयीं मदन धुसधुसी ॥ ३५ ॥
मग सारिते जाले रती ॥ शांत केले ते वेळीं सती ॥
धन्य ते पतिव्रता सती ॥ वचन न मोडी भ्रताराचें ॥ ३६ ॥
परी चमत्कार जाला अद्‍भुत ॥ पोटीं धरिती जाली गर्भातें ॥
नवमास भरतांचि तयेतें ॥ जाली प्रसूत कामिनी ॥ ३७ ॥
आश्चर्य करिती सकळजन ॥ म्हणती पहा नवल कोण ॥
वृद्धापकाळीं पुत्रनिधान ॥ देखे कामिनी आदरेंसीं ॥ ३८ ॥
कोणी निंदिती कोणी स्तविती ॥ तंव दोन पुत्र जाले तिजप्रति ॥
शारदा आणि शांती म्हणती ॥ नामें उभयतां ते साजिरी ॥ ३९ ॥
पुत्र उभयतां दोघेजण ॥ दिवसेंदिवस वृद्धिंगत जाण ॥
पंच वर्षे जालिया पूर्ण ॥ पुढें कथन अवधारा ॥ ४० ॥
गंगाजळी जलक्रीडा केली ॥ ते नग्न आणि रति संपादिली ॥
त्याची पापें फळा आलीं तात्काळीं ॥ तनु भाजली उभयतांची ॥ ४१ ॥
उभयतां विप्रकुमारातें ॥ सदासर्वकाळात तप्तता देहांतें ॥
चैन पडेना तयातें ॥ न सुचे अन्नउदक कांहीं ॥ ४२ ॥
लाहें लाहें संतप्त गात्र ॥ उपाय करिती नाना प्रकार ॥
मोह धरून मातापितर ॥ करितां उपचार त्रासले ॥ ४३ ॥
नाना परी उपाय केले ॥ परि व्यथा अधिक प्रबळें ॥
कुमार चरफडती बाळें ॥ दीन वदनें करूनिया ॥ ४४ ॥
शोक करिती मातापिता ॥ केउतें उदेलें हें अनंता ॥
वृद्धापकाळीं पुत्राची वार्ता ॥ देखिली सत्ता तुझिया ॥ ४५ ॥
तेथें ही दशा उद्‍भवली ॥ बाळकष्टी न देखती या काली ॥
महादेवाधिदेवा चंद्रमौळी ॥ वेळ आली मृत्याची ॥ ४६ ॥
ऐसा नानापरी विलाप ॥ करिती उभयतां मायबाप ॥
मग तयातें लाविती लेप ॥ शीतळता चंदनाची ॥ ४७ ॥
उत्तम चंदन आणुनी ॥ मर्दन करिती पुत्रालागुनी ॥
परी सीतळता नव्हेची नयनीं ॥ यथाभूत बाळक तें ॥ ४८ ॥
वार्ता फाकली नगरांत ॥ जनसमुदाय निरखू येत ॥
जे जे उपचार सांगत ॥ ते ते करिती मातापिता ॥ ४९ ॥
परी कांहीं केल्या नव्हें बरें ॥ अधिकच चरफडती कुमारें ॥
वृत्तांत ऎकता नृपवरें ॥ तोही येत धांवूनियां ॥ ५० ॥
नृप धार्मिक पाहीं ॥ देखून आश्चर्य करिती ह्रदयीं ॥
म्हणे माझिया राष्ट्री ऐसा नाहीं ॥ धन्वंतरी आगळा ॥ ५१ ॥
मग रायें शोध केला बहुत ॥ कोणी धन्वंतरी न मिळें तेथ ॥
नाहीं पंचाक्षरी महंत ॥ उपाव न चालत कवणाचा ॥ ५२ ॥
तव एक अपूर्व वर्तलें ॥ गालव ऋषी येतां देखिले ॥
रायें निजासनी बैसविले ॥ पूजन केले यथाविधी ॥ ५३ ॥
मग ऋषीते साद्यंत समाचार ॥ कथिता जाला साचार ॥
म्हणें न चालेची उपचार ॥ विप्रकुमर कष्टताती ॥ ५४ ॥
तें तंव न देखवे माझेनीं ॥ उपाव केला बहुतजनीं ॥
परी शांत नव्हे ज्याचेनीं ॥ कष्टती दोन्हीं मातापितरें ॥ ५५ ॥
ऐसें नृपाचें वाक्य ऐकुनी ॥ बोलता जाला गालवमुनी ॥
म्हणे ऐक नृप चक्रचूडामणी ॥ उपाया लागुनी सांगतो ॥ ५६ ॥
असेल जरी कोणी पतिव्रता ॥ तिचिया हस्तें उदक सिंचिता ॥
तरीं या ज्वरा तें होय शांतता ॥ सौख्यवार्ता बाळकातें ॥ ५७ ॥
ऐसें ऐकता नि उत्तरा ॥ रायें नगरीं पिटिला डांगोरा ॥
जी असेल पतिव्रता सुंदरा ॥ या त्वरा या ठायी ॥ ५८ ॥
नगरीं प्रगट जाली मात ॥ परी कोणी न बोले पतिव्रता सत्य ॥
राजभार्येसहित ग्रामवासी न येत ॥ किशोर उदक स्पर्शावया ॥ ५९ ॥
तंव नृप चाकाटला अंतरीं ॥ म्हणे कोणीही पतिव्रता सुंदरीं ॥
न देखोंची माझिया नगरी ॥ केउता पुढारी परिणाम ॥ ६० ॥
तरीं समग्रांची पापवार्ता ॥ ग्रामवासी राजकांता ॥
आहा हे केउते अनंता ॥ होऊ पाहे घाता बाळकासी ॥ ६१ ॥
आणि सत्वही गेलें नगरीचें ॥ हांसणे जालें सकळिकांचें ॥
ते तंव लांछन जालें जन्माचें ॥ बोलतां वाचें न बोलवे ॥ ६२ ॥
ऐसी चिंता करितां नृपनाथ ॥ तंव आश्चर्य वर्तले अद्‍भुत ॥
एक निषादी त्या समयांत ॥ आली तेथें अवचिता ॥ ६३ ॥
जातीची ते भिल्लिणी ॥ मस्तकीं काष्ठभारा घेउनि ॥
जात असे आपुले मार्गानीं ॥ तंव देखिलें नयनीं अपूर्व ॥ ६४ ॥
ग्रामवासी जनांचा मेळा ॥ अवलोकितसे अबळा ॥
मग मस्तकीचा भारा आपटिला ॥ आली तेथें जनसमुदावो ॥ ६५ ॥
वार्ता ऐकतां कर्णोकर्णी ॥ जे पतिव्रतेमाजी शिरोमणी ॥
असलिया भेटावें नृपालागोनी ॥ जिववावयाही बाळका ॥ ६६ ॥
ऐकत ऐसिया वचनातें ॥ येरी पतिव्रता धर्मातें ॥
ते ठाऊके नसेचि तियेतें ॥ कैसा आचार तोही न कळे ॥ ६७ ॥
परी तियेच नेम असे एक ॥ पतिवचनीं नसे वंचक ॥
सदांसर्वकाळ देख ॥ पति अवज्ञा नसेची ॥ ६८ ॥
स्वप्नीं नेणें परद्वाराते ॥ भाषणही करूं शके कवणातें ॥
ऐसें असतांती तेथे ॥ राजा जवळिकें पातली ॥ ६९ ॥
म्हणे कवण संकट तुम्हां ॥ तें निवेदी नृपसत्तमा ॥
रायें निवेदिलें सर्वही कर्मा ॥ तंव बोले भामानिषदाची ॥ ७० ॥
म्हणे उदक आण लवलाही ॥ मी तव पतिव्रता धर्म नेणें कांहीं ॥
परी कर्ता सर्व शेषशाई ॥ पाहे नवाई नृपवरा ॥ ७१ ॥
उदक घेऊनियां करीं ॥ काय बोले ते अवसरीं ॥
पतिअवज्ञा जन्मवरी ॥ केली नसे जाणपां ॥ ७२ ॥
नेणें परपुरुषाची वार्ता ॥ हे तंव ठाऊक असे जगन्नाथा ॥
ऎसें वदोनियां तत्वता ॥ उदक शिंपी बाळातें ॥ ७३ ॥
तव चमत्कार जाला अद्‍भुत ॥ तात्काळ ताप जाला शांत ॥
बाळ खडबडून उठत ॥ चरण वंदीत निषादीचे ॥ ७४ ॥
ऐसा चमत्कार पाहून जयजयकार करिती सर्वजन ॥
मग रायें वस्त्रालंकारें करून ॥ निषादीला लागून गौरविलें ॥ ७५ ॥
वरी एकग्राम तत्वता ॥ देता जाला नृपनाथा ॥
ऐसी निषादी पतिव्रता ॥ देखून समस्तां आश्चर्य ॥ ७६ ॥
ऐसें पतिव्रतेचें कथन ॥ लक्ष्मी तें वदे नारायण ॥
तेंचि तुम्हां कथिले संपूर्ण ॥ आचरा सर्वज्ञ सर्वतें ॥ ७७ ॥
म्हणोन सकळ धर्मामाजी धर्म ॥ स्त्रियेतें भ्रतारसेवेचा नेम ॥
तयाच्या वचनीं प्रेम ॥ धरूनि वर्ते सर्वदा ॥ ७८ ॥
मग तियेतें करणें नलगे आन ॥ कांही एक जपतपसाधन ॥
आपुला भ्रतार तोची नारायण ॥ पावे मोक्ष सदनतें पैं ॥ ७९ ॥
यालागीं सकळजनीं ॥ वर्तावें भावार्थ धरूनी ॥
मग तयातें उपेक्षिना कोणी ॥ यम पायधुनी माथा वंदी ॥ ८० ॥
स्वस्ति श्रीमलमहात्म्य ग्रंथ पद्‍मपुराणींचें संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ अष्टविंशतितमो ऽ ध्याय गोड हा ॥ २८ ॥
ओव्याः ८० ॥ श्लोक ३ ॥
॥ इति अष्टविंशतितमोऽध्यायः ॥

Explore More