Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 3

(Purushottam Maas Katha Adhyay 3)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 3

Purushottam Maas Katha Adhyay 3. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 228
श्री गणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
जयजयाजी रघुराया ॥ नमन माझे तुमच्या पायां ॥
करुणा करावी सखया ॥ करा छाया कृपेची ॥ १ ॥
तुमचे कटाक्षें करून ॥ निरसो माझें भव अज्ञान ॥
स्वरूपीं लागो अनुसंधान ॥ हेंचि कृपादान मज द्यावें ॥ २ ॥
मी बुडतों या भवसागरीं ॥ येथूनि मातें काढीं सत्वरी ॥
पुढें जें होणें असेल परी ॥ ते सुखें श्रीहरी होऊ कां ॥ ३ ॥
तरणोपाय तें साधन ॥ मीं तव नेणें आणीक जाण ॥
परी तव चरणीं ठेवूनि मन ॥ आरंभिली हे काळक्रमणा ॥ ४ ॥
श्रोती होऊनि सादर ॥ श्रवण कीजे कथाप्रसर ॥
नूतन कथा म्हणूनि अव्हेर ॥ न कीजे स्वामिया ॥ ५ ॥
नूतन हे पद्यरचना ॥ कथा भाग पूर्वील जाणा ॥
समंत घेतलें पद्मपुराणा ॥ श्लोक जाणा तेथीचे ॥ ६ ॥
नारायण उवाच॥
न कृशांमृतवत्सां वा वंध्यां रोगान्वितां तथा ॥
न च व्यंगामतिश्रांतां गां दद्यान् ब्राह्मणाय वै ॥ १ ॥
ऐक लक्ष्मी सावधान ॥ मागे निरोपिलें गोदान ॥
परीं तें पाहिजे सुलक्षण ॥ अलक्षण नसावें ॥ ७ ॥
असावी सुंदर पौष्टिक ॥ आणि वरी सवत्सक ॥
दुग्धीं जेवीं बलाहक ॥ वर्षेतोय अपार ॥ ८ ॥
रोड अथवा रोगिष्ट ॥ मृत वत्स नसावें स्पष्ट ॥
किंवा वंध्या असोनि वरिष्ट ॥ कामा नये दानातें ॥ ९ ॥
अथवा रोगी व्याप्त शरीरीं ॥ दुग्ध न देती तिळभरी ॥
ऐसी धेनु दानातें निर्धारी ॥ योग्य सुंदरी नसे पै ॥ १० ॥
लातरी खैरींडी वरी ॥ एकश्रृंगी नसावी तरी ॥
आपुलें पय आपण प्राशन करी ॥ पान्हा चोरी दोहितां ॥ ११ ॥
ऐसियाचें न कीजे दान ॥ दान केलिया कवण पुण्य ॥
जैसे अजागळींचे स्तन ॥ दुग्ध ना शोणित कांहीं ॥ १२ ॥
लक्षणयुक्त धेनु बरवी ॥ सहकुटुंबी ब्राह्मणातें द्यावी ॥
अलंकारयुक्त असावी ॥ दोहनपात्रासहित ॥ १३ ॥
ऐसी दिधलिया दान ॥ तेणें संतोषे जनार्दन ॥
मग ते पावती मोक्षसदन ॥ यासीं संदेह जाण असेना ॥ १४ ॥
अपात्रीं केलिया दान ॥ तरी तें नरकासी कारण ॥
म्हणोनी सत्पात्री ब्राह्मण ॥ पाहोनि दान पैं द्यावें ॥ १५ ॥
बहुक्षीरां च यो गां वै ब्राह्मणायोपपादयेत् ॥
उत्तारयेत्सचात्मानं सप्तसप्त कुलानिच ॥ २ ॥
धेनू ते बहुत दुग्धाची ॥ सुलक्षणीक सवत्साची ॥
दान दिधलिया ऐशाची ॥ तरी पदवीं साची पावेतो ॥ १६ ॥
तयाचा जन्म सफळ झाला ॥ आणी सप्तकुळांचा उद्धार केला ॥
इतर दीन पुरुषाला ॥ दान तयाला घडेना ॥ १७ ॥
म्हणोनियां मलमासी जाण ॥ अगत्य कीजे गोदान ॥
नारी अथवा पुरुष जाण ॥ भाग समान उभयासीं ॥ १८ ॥
गावो यज्ञस्य नेत्रे वै गावोयज्ञस्य वै मुखं ॥
अमृतंह्य क्षयं दिव्यं क्षीरं गावोवहंतिच ॥ ३ ॥
अहो हे धेनू यज्ञाचे नेत्र ॥ आणि यज्ञमुख स्वतंत्र ॥
वरुषे अमृत क्षीरमात्र ॥ जें दुर्लभ सुरातें ॥ १९ ॥
इंद्रादी सुरवर पाहीं ॥ म्हणती अमृत असे पाहीं ॥
परी क्षीर आम्हांतें प्राप्त नाहीं ॥ जें भूलोकी अपार ॥ २० ॥
म्हणोनि समग्र सुरवर ॥ धेनुगात्री प्रवेशले साचार ॥
आणि सरिता अपार ॥ प्रवेशल्या धेनु आंगीं ॥ २१ ॥
यदर्थी श्लोक संमतीचा ॥ असे हो ग्रंथांतरीचा ॥
तोची निवेदितों साचा ॥ अर्थ तयाचा पाहावा ॥ २२ ॥
श्रृंगमूले गवां नित्यं ब्रह्माविष्णु समाश्रितौ ॥
श्रृंगाग्रे सर्वतीर्थानि स्थावराणि चराणिच ॥ ४ ॥
तव आशंका घेऊन सत्वर ॥ श्रोतीं बोलिलें उत्तर ॥
सर्वगात्री सुरवरा ॥ किंकारण प्रवेश ॥ २३ ॥
यदर्थी इतिहास बरवा ॥ श्रोतीं एकचित्तें परिसावा ॥
जो ऐकता सर्व जीवा ॥ संशय फिटे अनायासें ॥ २४ ॥
तरी पौलव्यनामें ऋषीश्वर ॥ तपोबळें मुनिवर ॥
कष्टविलें जें स्वशरीर ॥ तप अपार आचरला ॥ २५ ॥
तयाचि तपसामर्थ्ये ॥ भय उपजले वासवातें ॥
मग प्रेरिता झाला अप्सरातें ॥ तपक्षयातें ऋषीच्या ॥ २६ ॥
अप्सरा म्हणती अमरेशा ॥ तपातें क्षय कीजे कैसा ॥
परम कोपिष्ट ऋषी राजसा ॥ देखतां आम्हा शापील ॥ २७ ॥
तंव आज्ञा देतसे इंद्र ॥ आतां तुम्हीं जावें सत्वर ॥
पुढें असेल जें होणार ॥ तें तें सुखें होऊ कां ॥ २८ ॥
इंद्राचा हा स्वाभाविक गुण ॥ तपातें क्षय करावा जाण ॥
हें पूर्वापार लक्षण ॥ वासवा आंगीं असे पैं ॥ २९ ॥
असो आज्ञा घेऊन अप्सरा ॥ येत्या जाल्या त्या अवसरा ॥
निवास जेथें ऋषीवरा ॥ महाराज पौलव्यातें ॥ ३० ॥
येऊनियां आश्रमानिकटीं ॥ ऋषीतें अवलोकिलें दृष्टीं ॥
तंव तो तपस्वी महाहटी ॥ तपश्चर्ये बसला असे ॥ ३१ ॥
तंव त्या देवांगना जाणा ॥ अवलोकुनि ऋषीराणा ॥
चमकत चमकत सन्निधाना ॥ हास्यवदन अवलोकिलें ॥ ३२ ॥
ध्यान विसर्जुनि मुनी ॥ तयातें देखिले नयनीं ॥
मग पुसे तयालागुनी ॥ किमर्थ कहर मांडिला ॥ ३३ ॥
आम्हीं न मागों कवणातें कांहीं ॥ हा किमर्थ पेटला आमुचे डाई ॥
म्हणोन क्रोधयुक्त तें समई ॥ शाप द्यावया उदित ॥ ३४ ॥
शापोदक करी घेउनी ॥ आव्हानिलें वासवालागुनी ॥
तों येरीकडे काय झाली करणी ॥ इंद्रभुवनी पैं तेव्हां ॥ ३५ ॥
सिंहासनावरी वासवो ॥ तंव खळबळिला तयाचा देहो ॥
चंचळ होताची पहा हो ॥ सभोंवतें अवलोकित ॥ ३६ ॥
शापोदकाचे सामर्थ्य मोठें ॥ इंद्राचें आंगीं उठले कांटे ॥
मग पिशाचवत पळतसें नेटें ॥ जेथें असे कमळासन ॥ ३७ ॥
घाबरेपणीं ते समयीं ॥ ब्रह्मयाचे पदीं मस्तक ठेवी ॥
म्हणे आतां रक्षीये समयीं ॥ करुणा करा दातारा ॥ ३८ ॥
कमळासन म्हणे तेव्हां ॥ अपराध घडला वासवा ॥
तो साकल्प आम्हां निवेदावा ॥ म्हणजे उपाव सुचेल ॥ ३९ ॥
तंव बोले सुरेश्वर ॥ पौलव्य ऋषी तपें थोर ॥
तया छळणा सत्वर ॥ देवांगना प्रेरिल्या मी ॥ ४० ॥
इतका इकडे वृत्तांत झाला ॥ तिकडे ऋषीतें विलंब लागला ॥
म्हणे अजुन इंद्र का नाहीं आला ॥ किमर्थ लागला विलंब ॥ ४१ ॥
काय माझी झाली तपहानी ॥ मलीनता जाली तपालागुनी ॥
म्हणोन ध्यानी विचारुनी ॥ पाहातसे ॥ ४२ ॥
तंव इंद्रातें न देखे निजासनीं ॥ तो तंव गेलासे पळुनी ॥
कमळासनें आश्वासुनी ॥ निजासनीं बैसविला ॥ ४३ ॥
मग ऋषि आणिक उदक ॥ घेता जाला निःशंक ॥
आव्हानिला कमळनायक ॥ इंद्रासहित ते काळीं ॥ ४४ ॥
तंव आसनी चंचल ब्रह्मदेव ॥ म्हणे फळला तुमचा प्रादुर्भाव ॥
आम्हांसहीत ऋषीराव आव्हानिता झाला शापातें ॥ ४५ ॥
आतां उपाव तरी कवण ॥ जवळी करावा जनार्दन ॥
मग उभयतां तेथून ॥ निघते झाले लगबगें ॥ ४६ ॥
घाबरेपणीं येऊन जाण ॥ नमिते जाले जनार्दन ॥
मग म्हणती तया लागून ॥ रक्षीं भयापासून महाराजा ॥ ४७ ॥
जयजयाजी जनार्दना ॥ जगपाळका विश्वरक्षणा ॥
हे दयानिधी करुणाघना ॥ शरणांगता वज्रपंजरु ॥ ४८ ॥
पतीतपावन हे ब्रीदावळी ॥ ती सत्य करीजे येकाळीं ॥
आम्हीं अपराधी कृपाबळी ॥ आम्हां रक्षी दातारा ॥ ४९ ॥
ऐकुनी ऐसें उत्तर ॥ बोलता जाला कमळावर ॥
कवणें केला तुम्हांतें जोजार ॥ तोचि प्रकार सांगिजे ॥ ५० ॥
तंव बोले कमळासन ॥ पौलव्यऋषी तो तपोधन ॥
तया छळावया लागुन ॥ अप्सरा वासवें पाठविल्या ॥ ५१ ॥
परमक्रोधी ऋषिसज्जन ॥ शापोदकें वासवातें पराभवून ॥
तेणें तो भयाभीत होऊनि जाण ॥ मजजवळी पातला ॥ ५२ ॥
आम्ही आश्वासिलें तत्वता ॥ तो शाप आला मज भोंवता ॥
म्हणोनिया उभयतां ॥ येतों जालों तव दर्शना ॥ ५३ ॥
आतां कळेल तैसें पाहीं ॥ आम्हा रक्षी नाना उपायीं ॥
मग बोलता जाला शेषशाई ॥ ते समयीं सुरेशातें ॥ ५४ ॥
येचविषयीं प्रथम शिकवण ॥ तुम्हांतें निवेदिलीसे जाण ॥
जे न छळावें ब्राह्मणालागून ॥ सहसा जाण सुरेशा ॥ ५५ ॥
ब्रह्मशापें करूनियां ॥ तंव संपत्ति गेली विलया ॥
मग ते सागरीं काढावया ॥ परम कष्ट मज झाले ॥ ५६ ॥
यालागीं कैसा असो ब्राह्मण ॥ परी ते माझेंची मुख जाण ॥
न कळे तयाचें विंदान ॥ कवणे घटी कैसा मी ॥ ५७ ॥
ऐसें बोलत बोलत ॥ क्षण एक अवकाश लागला तेथ ॥
तों येरीकडे पौलव्य काय करित ॥ विचारित निजमानसीं ॥ ५८ ॥
म्हणे अद्याप वरि पाही ॥ उभयतां तें न देखो येकेठायीं ॥
म्हणोन पेटलासे तोडाई ॥ उदक आणिक घेतलें ॥ ५९ ॥
विष्णुसहीत ब्रह्मदेवो ॥ आव्हानिता जाला वासवो ॥
तंव वैकुंठीं देवाधिदेवो ॥ घाबरा झाला निजांगीं ॥ ६० ॥
म्हणें ऋषीचिया भया ॥ आलेत तुम्हीं लपावया ॥
परि संग दोष पाहिया ॥ आम्हां भोंवला तात्काळ ॥ ६१ ॥
मजसहीत तुम्ही दोघे ॥ ऋषीनें उदक घेतले रागें ॥
म्हणोन उठला लागवेगें ॥ कैलासमार्गे पळाला ॥ ६२ ॥
पुढें पळतसे जनार्दन ॥ मागें धापें दाटलें दोघेजण ॥
बापशापाचें भय दारुण ॥ वाहे भगवान स्वआंगें ॥ ६३ ॥
ब्राह्मण शाप परम द्वाड ॥ राजा नहुष केला सरड ॥
नारदाची नारदी लज्जेआड ॥ लपत हिंडे चहूंकडे ॥ ६४ ॥
ऐसे सांगो आतां किती ॥ कथा परिसवू पुढती ।
ऐसें पळतां त्रिवर्गाप्रती ॥ कैलासपती आटोपिला ॥ ६५ ॥
जोडुनिया करपुटी ॥ नमिते जाले धूर्जटी ॥
वाचा जालीसे हिंपुटी ॥ बोलता ओठी शब्द न ये ॥ ६६ ॥
तव बोले शूळपाणी ॥ किमर्थ आगमन ये स्थानीं ॥
आकर्णूनी ऐसी वाणी ॥ हसुनी बोले माधव ॥ ६७ ॥
मग आद्यंत वर्तमान ॥ निवेदिता झाला जनार्दन ॥
वासवें केलें विघ्न दारुण ॥ आलो धावून या ठायां ॥ ६८ ॥
ऐसे लाघवी याचे शब्द ॥ ऐकूनी हासे वृषभध्वज ॥
उभयतांचें अंतर सहज ॥ एक म्हणोनी ॥ ६९ ॥
आसनें देऊन तिघांसीं ॥ बैसविलें आपणापाशीं ॥
तों येरिकडें काय करी तपोराशी ॥ पौलव्य तो ऋषीराणा ॥ ७० ॥
ध्यानीं विचारी जों मुनी ॥ तंव तिघे न दिसती स्वस्थानीं ॥
शापभयें गेले पळुनीं ॥ लपाले लपनीं कैलासी ॥ ७१ ॥
मग शिवासहित ऋषेश्वरीं ॥ आणीक उदक घेतलें करीं ॥
आव्हानितांच त्रिपुरारी ॥ गेला चांचरी निजासनीं ॥ ७२ ॥
चंचळ देखुनी सदाशिवा ॥ गुंडाळिला भस्मबटवा ॥
हें देखुनी रमाधवा ॥ हास्य तेधवां नाटोपे ॥ ७३ ॥
मग म्हणेजी खट्‌वांगपाणी ॥ हे काय आरंभिली करणी ॥
गार्‍हाणें सांगावया या स्थानीं ॥ आलों धांवुनी महाराजा ॥ ७४ ॥
तुमची तों दिसे ऐसी गती ॥ आतां जावें कवणाप्रती ॥
कवण निवारील यातायाती ॥ म्हणोन चित्ती संदेहो ॥ ७५ ॥
तंव बोले सदाशिव ॥ तुमचा कळला भाव ॥
टाकूनी जावे हा ठाव ॥ ऐसें वाटे मजलागीं ॥ ७६ ॥
मग सखेद होऊन अंतरीं ॥ बोलता जाला मुरारी ॥
पुढें कैसी की जे परी ॥ हें अंतरीं विचारावें ॥ ७७ ॥
शिव म्हणे माधवासीं ॥ विचार न सुचे मानसीं ॥
कांकीं ते दोघेही एकमेकांसीं ॥ अंतरसाक्षी म्हणोनी ॥ ७८ ॥
वाढवावया ब्राह्मणांचे महिमान ॥ म्हणोनि मांडिलें हें निर्वाण ॥
पुढील जाणोनी कारण ॥ महिमान गौतमीचें ॥ ७९ ॥
मग विष्णु विचारून अंतरी ॥ म्हणे ऐकिजे हो त्रिपुरारी ॥
ब्राह्मणाचा उपाय निर्धारी ॥ धेनूवरी चालेना ॥ ८० ॥
तरी पाचारूनी धेनूलागीं ॥ आपण प्रवेशुं तिचे आंगीं ॥
पुढें होईल त्याप्रसंगीं ॥ विलोकुं आंगीं सादर ॥ ८१ ॥
विचार मानला सर्वांते ॥ मग पाचारिलें धेनूतें ॥
संकटी रक्षी आम्हांतें ॥ म्हणोनि बोलते पै जाले ॥ ८२ ॥
तथास्तु म्हणोन पाहीं ॥ धेनू वदली ते समयीं ॥
मग प्रवेश करिते जाले देहीं ॥ ऐका सर्वही श्लोकार्थ ॥ ८३ ॥
श्रृंगमूले गवानित्यं ब्रह्माविष्णुसमाश्रितौ ॥
श्रृंगाग्रे सर्वतीर्थानि स्थावराणि चराणिच ॥ ५ ॥
शिरोमध्ये महादेवः सर्वभूतमयस्थितः ॥
ललाटाग्रे स्थितादेवी नासावंशेच षण्मुखः ॥ ६ ॥
कर्णयोरश्विनौ चैव चक्षुषोःशशिभास्करौ ॥
दंतेषुवायवः सर्वे जिव्हायां वरुणस्थितः ॥ ७ ॥
सरस्वतीच हुंकारे यमयक्षौच गंडयोः ॥
संध्याद्वयंतथोष्ठाभ्यां ग्रीवायामिंद्रसंस्तितः ॥ ८ ॥
साक्षद्वंगाचगोमूत्रं गोमये यमुनास्थिता ॥
त्रयस्त्रिंशत्तु देवानां कोट्योरोम सुसंस्थिताः ॥ ९ ॥
ऐशिया परी सर्व देव ॥ तेतीस कोटीसहित वासव ॥
गंगायमुनादी सर्व ॥ वास सर्व करिते झाले ॥ ८४ ॥
तै पासुनी धेनू आंगीं ॥ वास असेहो नवांगीं ॥
पुढें वर्तलिया प्रसंगीं ॥ अवधान दीजे ॥ ८५ ॥
येरीकडे पौलव्यमुनी ॥ आव्हानितां न देखे कोणी ॥
पुढे अवलोकी जो नयनीं ॥ तो देखे नयनीं धेनूतें ॥ ८६ ॥
अवघें निरखून धेनूतें ॥ तंव धेनु आंगीं सर्व दैवतें ॥
अवलोकितां पावला विस्मयातें ॥ म्हणे आतां कउतें करावें ॥ ८७ ॥
मग विवेक आठवून अंतरीं ॥ तया धेनूतें नमस्कारी ॥
विवेका ऐसा साहाकारी ॥ आणिक नसे क्रोधाते ॥ ८८ ॥
क्रोध आलिया शरीरीं ॥ अनर्थातें उभा करी ॥
तेथें विवेक तो आवरी ॥ निवारी जो अनर्थातें ॥ ८९ ॥
विवेक करूनि पाहाहो ॥ क्रोधें शांत केला देहो ॥
मग तया प्रसन्न महादेवो ॥ सर्व देवांसहीत पै ॥ ९० ॥
पुरवून ऋषीची मनकामना ॥ वाहून नेला वैकुंठभुवना ॥
ऐशीही कथा श्रोतेजना ॥ परिसविली जाणा शास्त्राधारें ॥ ९१ ॥
म्हणोनियां मलमासीं ॥ दान द्यावें धेनूसी ॥
स्त्री अथवा पुरुषासी ॥ लाभ उभयासीं समान ॥ ९२ ॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ॥ येहीं दान करावें पवित्र ॥
पाहुनि ब्राह्मण सत्पात्र ॥ यथायोग्य दान दीजे ॥९३ ॥
तया योगें पुण्यवंत देह ॥ पापाचा तो होय क्षय ॥
म्हणोनि सुलभ उपाय ॥ धेनूसेवा निवेदिली ॥ ९४ ॥
अनेन विधिना धेनुं यो विप्राय प्रयच्छति ॥
सर्वकामसमृद्धात्मा विष्णुलोके महीयते ॥ १० ॥
सर्वेषामपि पापानां ज्ञातानामविजानतं ॥
प्रायश्चित्तमिदंप्रोक्तमृषिभिस्तत्वदर्शिभिः ॥ ११ ॥
ऐसिया परी श्रोतियातें ॥ कथा निवेदिली संतातें ॥
न्यून पूर्ण जें तें क्षमामातें ॥ कृपावंतें पै कीजे ॥ ९५ ॥
माझें सरतें हें बोलणें ॥ जैसें खर्‍यामाजी खोटें नाणें ॥
मेळविती जेवी कुजनें ॥ तेवी बोलणें पै माझें ॥ ९६ ॥
व्यासोक्तवाणी खरें नाणें ॥ तोचि श्लोकार्थ अनुभवावें ॥
सरता केला प्राकृतें जाण ॥ नव्हे बोलणें पदरिंचें ॥ ९७ ॥
मी नव्हे कविता कुशळ ॥ नाहीं संकृत वाणी निर्मळ ॥
सर्वांपरि मी अमंगळ ॥ संती सांभाळ पै कीजे ॥ ९८ ॥
नाहीं उद्योग व्यवसाय कांहीं ॥ तपश्चर्या न घडेचि देहीं ॥
म्हणोन काळक्रमणें स्तव पाहीं ॥ उदेला देहीं उद्गारु ॥ ९९ ॥
परि बुद्धिदाता तो समर्थ ॥ शिरावरी माझिया रघुनाथ ॥
वदता वदविता तोचि येथ ॥ बुद्धिदाता निर्धारें ॥ १०० ॥
स्वस्ति श्रीमलमाहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणींचें संमत । मनोहरसुत विरचित ॥
तृतीयोध्याय गोड हा ॥
ओवी संख्या ॥ १०० ॥ श्लोक ११ ॥
॥ इति तृतीयोध्यायः ॥

Explore More