Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 7

(Purushottam Maas Katha Adhyay 7)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 7

Purushottam Maas Katha Adhyay 7. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 221
श्री गणेशाय नमः ॥
श्रीराम जयराम राघवा ॥ पतितपावना रमाधवा ॥
करुणानिधे दयार्णवा ॥ देवाधिदेवा दीनबंधो ॥ १ ॥
तव चरणसरोजीं मीन ॥ राहो सदा होऊनि मन ॥
ऐसें देई मज वरदान ॥ कृपा निधान राघवा ॥ २ ॥
तव कृपाबळें समस्त ॥ वदेन म्हणतसें हा ग्रंथ ॥
पुरवीं माझा मनोरथ ॥ कृपावंता दीनाचा ॥ ३ ॥
श्रीरुवाच ॥ देवेश्वरं रमानाथ पुनर्दीपफलंवद ॥
यथ येन कृतो दीपेविध्वस्तेः किं च पातकं ॥ १ ॥
लक्ष्मी म्हणेहो देवाधिदेवा ॥ प्रश्नाक्षर परिसावा ॥
पुनः दीपदानाते परिसावा ॥ कृपा करूनि स्वामिया ॥ ४ ॥
मागील अध्यायीं कथन ॥ दीपसरसावितां जाण ॥
मार्जार गेला उद्धरून ॥ नवल विंदान ऐकिलें ॥ ५ ॥
तरी दीप सरसावितां । इतुकें पुण्यजी तत्वता ॥
मग दीपातें विध्वंसिता ॥ कवण वार्ता तयाची ॥ ६ ।
ऐसा प्रश्नाक्षर रमेचा ॥ आकर्णून वदे स्ववाचा ॥
स्वामी जो दीनजनाचा ॥ वदता झाला ते काळीं ॥ ७ ॥
श्रीकृष्ण उवाच॥
पुनरन्यत्प्रवक्ष्यामि दीपस्य फलमुत्तमं ॥
दीपविध्वंसने पुण्यं सर्व नश्यति यत्कृतं ॥ २ ॥
मग वदे वासुदेवा ॥ ऐकें दीप विध्वंसनाचा प्रभावो ॥
ये विषयींचा इतिहास पहा हो ॥ श्रवण करा हो आदरें ॥ ८ ॥
पूर्वी मधुवनाचे ठायीं ॥ एक सामवेदी विप्र असे पाही ॥
शांकली नाम तया देहीं ॥ असे निजगृहीं आनंदें ॥ ९ ॥
सदाचारी शुचिष्मंत ॥ स्नानसंध्या वेदपारंगत ॥
देवार्चनीं नित्यरत ॥ पुराण सांगत स्वगृहीं ॥ १० ॥
दुष्ट प्रतिगृह न घे कवणाचा ॥ उपार्जना नसे दीनवाचा ॥
स्वधर्म पाळून नेमाचा ॥ काळक्रमणें चालवीत ॥ ११ ॥
तयातें भार्या उभयतां दोघी ॥ विमलिका सुशीला पाही ॥
एकमय वर्तती त्रिवर्गही ॥ नसे कांहीं विपरीत ॥ १२ ॥
तयामाजी ज्येष्ठ सुशीला ॥ सदां सादर पतिवचनाला ॥
अंतर पडो नेदी वाचेला ॥ परम तत्पर दिवसनिशी ॥ १३ ॥
त्याहीवरी अतीत अभ्यागत ॥ कथापुराण श्रवण करी नित्य ॥
गृहाचारींही नित्य नैमित्य ॥ असे चालवित यथा विभागें ॥ १४ ॥
ज्यावेळीं प्रसंग पडे जैसा ॥ संसार प्रसंग चालवी तैसा ॥
सत्कर्मी लावितसे वयसा ॥ क्रमित ऐसा काळ पै ॥ १५ ॥
धन्य धन्य ऐशी कामिनी ॥ पतिव्रता शिरोमणी ॥
सदां सादर पती भजनीं ॥ पूर्वपुण्यें लाधिजे ॥ १६ ॥
धन्य तयाचा संसार ॥ जेणें पूर्वी अर्चिला रमावर ॥
म्हणोनि ऐसियेसीं संसार ॥ करणें घडे तयातें ॥ १७ ॥
नाहीं तरी दुर्मुखी भार्या ॥ मिळतां संसार गेला वायां ॥
तेथें पुण्य मार्गाची क्रिया ॥ तया प्राणिया कोठुनी ॥ १८ ॥
परी ऐसी नव्हे ती सुशीला ॥ परम पतिव्रता मंगला ॥
ऐसियेचें नाम घेतां आगळां ॥ दोषमळ परिहरती ॥ १९ ॥
तंव कवण एक अवसरीं ॥ पुराण श्रवणीं बैसे ते नारी ॥
तंव तेथें अधिकमास परी ॥ केलें निर्धारी श्रवण ॥ २० ॥
मग निजध्यास धरुनि मनीं ॥ परम विनीत होऊनी ॥
भ्रतारातें बोलतसे वाणी ॥ मधुर वचनीं तेधवां ॥ २१ ॥
भगवत्प्रष्टुमिच्छामि क्रोधं कर्तुनचार्हंसी ॥
अद्यकः पुण्यदिवसोलोकोयाति रवेःसुतां ॥ ३ ॥
हे नाथ हे स्वामीदेवा ॥ आज कवण पर्वणीचा ठेवा ॥
सर्व जनाचा मिळोन थवा ॥ जाती रेवातीरा स्नानार्थ ॥ २२ ॥
जरी कृपा करूनियां मज ॥ आज्ञा दिधलिया सहज ॥
तरी स्नाना जाऊनियां चोज ॥ निरखूं आज निजनयनीं ॥ २३ ॥
ऐकून ऐसी मंजुळवाणी ॥ शांकली बोले ते क्षणीं ॥
म्हणे आजिचिये पर्वणीं ॥ प्राप्त जाला मळमास ॥ २४ ॥
हा तंव पुरुषोत्तममास ॥ म्हणोनी जन जाता स्नानास ॥
हे व्रत करावें सायास ॥ धरूनि हव्यास निजमनीं ॥ २५ ॥
एक मासावरी चालवितां नेम ॥ तरी सकळ पापें होती भस्म ॥
संतुष्टोनी पुरुषोत्तम ॥ पावती आराम स्वपदीं ॥ २६ ॥
शांकलिरुवाच ॥ श्रृणुभद्रे प्रवक्ष्यामि यदर्थ यांति नागराः ॥
असंक्रांतः समायातोमासः श्रीपतिवल्लभः ॥ ४ ॥
तरी माझिये आज्ञेवरी ॥ तूं ह्या व्रतातें स्वीकारी ॥
प्रातःस्नान करून आदरीं ॥ दीपदानातें करी सुशीले ॥ २७ ॥
ऐसी आज्ञा होतां ते काळीं ॥ परमहर्षयुक्त जाली ते बाळी ॥
मग नमन करूनि गंगाजळीं ॥ स्नानालागीं पातली ॥ २८ ॥
स्नान करून यथाविधीं ॥ परतुनी आली गृहासंधी ॥
करून देवतार्चन विधी ॥ दीपदान संधी पाहात ॥ २९ ॥
तंव येणें प्रकारें जाणा ॥ प्रथम दिवसीं करिती जाली अंगना ॥
पासूनियां द्वितीयदिना ॥ यथानुक्रमें करीतसे ॥ ३० ॥
ताम्रपात्री सुकृतेंसी ॥ दीप ठेवीतसे सायासीं ॥
तया तळवटीं मृन्मय कुंभासीं ॥ भरून ठेवीतसे आदरें ॥ ३१ ॥
मग तयाची पूजा विधियुक्तें ॥ करून पाचारीं ब्राह्मणातें ॥
तयाची पूजा करून नमस्ते ॥ दक्षिणेसहीत अर्पीतसे ॥ ३२ ॥
श्रोते घेतील आशंका ऐसी ॥ केवि वदतां मृत्तिका कुंभासी ॥
न चाले अवांतर धातूसी ॥ म्हणोनि मृण्मयासी वदलेती ॥ ३३ ॥
ऐसी आशंका श्रोते चतुर ॥ घेता ऐकाहो प्रत्युत्तर ॥
तरी दरिद्रव्यथा ऐसी थोर ॥ नसे निर्धार जगातें ॥ ३४ ॥
म्हणोनि ती सुशीला पाहीं ॥ दरिद्रव्याप्त निजगृहीं ॥
इतर धातूचा स्पर्श तोही नाहीं ॥ मृत्तिका पात्र या लागीं ॥ ३५ ॥
जयावरी कृपा श्रीची ॥ तयानें कीजे इतर धातूचीं ॥
यदर्थी वार्ता संशयाची ॥ मना नाणिजे श्रोतेहो ॥ ३६ ॥
ऐसें करितां व्रताचरण ॥ सुशीला नित्य करी आपण ॥
तंव सापत्‍न भाव मनीं कल्पून ॥ करीतसे विघ्नविमला पैं ॥ ३७ ॥
व्रत करीते नाम सुशीला ॥ नामासारखी करणी अचळा ॥
दुजीते नामाभिधान विमळा ॥ परी द्वेष कल्लोळा ह्रदयीं वसे ॥ ३८ ॥
एका पुरुषातें दोघी नारी ॥ पहातां दोघीची विपरीत परी ॥
एक मळातें त्यागी स्वीकारी ॥ हे खूण चतुरीं जाणिजे ॥ ३९ ॥
असो ते विमळ नारी ॥ निशीदिनी टपतसे निर्धारी ॥
जेवी मूषका लागीं अंतरीं ॥ बिडाळकू जैसा ॥ ४० ॥
तैशापरी अहोरात्रीं ॥ जपतसे ते सुंदरी ॥
मत्सर धरून अंतरीं ॥ विघ्ना लागीं उदित ॥ ४१ ॥
पहा दुर्जनाचा स्वभावो ॥ दुजियातें करावा अपावो ॥
हा तरी सहजीं स्वभावो ॥ अंगप्रभावो दुर्जनाचा ॥ ४२ ॥
यालागीं श्रीरघुपती ॥ नको हे दुर्जनाची संगती ॥
तात्काळ भ्रमे सुमती ॥ लागतां संगती तयाच्या ॥ ४३ ॥
ऐसें जपत असतां विमळेस ॥ संधी साधी मासार्ध दिवस ॥
तंव सुशीला गेली स्नानास ॥ लक्षुनी दिवस एकादशी ॥ ४४ ॥
सिद्ध करूनि दीपपान ॥ मग गेली स्नानालागून ॥
तंव येरी काय करी कारण ॥ दीप मालवूनि विझविला ॥ ४५ ॥
दीपघृतातेंही उलंडिलें ॥ रिक्तपात्र करून ठेविले ॥
ऐसें करिता तये वेळें ॥ तो स्नानाहून आली सुशीला ॥ ४६ ॥
करूनि देव देवतार्चन ॥ म्हणे द्यावें आतां दीपदान ॥
नेत्रीं पाहे जें विलोकून ॥ तों घृतेसहीत विझोनी दीप गेला ॥ ४७ ॥
चित्तीं म्हणे मार्जार करणी ॥ करूनि गेलें येक्षणीं ॥
पुनः साहित्य मेळवूनीं ॥ करी कामिनी दीपदान ॥ ४८ ॥
ऐसें प्रत्यही होत जाय ॥ येरी म्हणे होतसे काय ॥
घडत असे जो पर्याय ॥ विदित नव्हे तयेतें ॥ ४९ ॥
ऐशिया परी ते विमळा पाहीं ॥ कर्म करूनि विचरे स्वगृहीं ॥
सुशीळा खेद करी ह्रदयीं ॥ म्हणे कवण अपायीं प्रवर्तला ॥ ५० ॥
नेणो जन्मांतरीचा ठेवा ॥ मज कैचें घडेल पुण्य देवा ॥
हे जनार्दना माधवा ॥ कवण उपाया करूं मी ॥ ५१ ॥
ऐसी चिंता करितां ते कामिनी ॥ जपत बैसली ते क्षणीं ॥
तों नित्य प्रकार करणी ॥ करून गेली विमळा ती ॥ ५२ ॥
परी तयां दिनीं काय केलें ॥ विमलेनें मनीं जाणितलें ॥
म्हणोन घृत पात्रीं भरून ठेविलें ॥ उर्वरीत स्नेह दीपाचें ॥ ५३ ॥
हें पाहून आपुले नयनीं ॥ खेद करिती झाली मनीं ॥
म्हणें देवदेवा चक्रपाणि ॥ यासीं यालागुनी करूं काय ॥ ५४ ॥
वृत्तांत सांगितला भ्रतारासीं ॥ तो तंव विहित धर्म नोहे मजसी ॥
सवती मत्सर म्हणोन तयासीं ॥ निजमानसीं क्रोधें भरलें ॥ ५५ ॥
ऐसें विचारून अंतरीं ॥ कांहीं न बोले ते सुंदरी ॥
कुसमुसुनि राहे अंतरीं ॥ गृहाचारी वर्ततसे ॥ ५६ ॥
येणें प्रकारें करून ॥ व्रत करिती जाली संपूर्ण ॥
करूनियां उद्यापन जाण ॥ ब्राह्मण संतर्पण यथाविधी ॥ ५७ ॥
संपूर्ण एकमास भरतां ॥ काय प्रवर्तली कथा ॥
तिघे पुत्र विमळेसीं असतां ॥ मृत्युपंथाते गेले ॥ ५८ ॥
एकामागें एक ॥ मरण पावले हो सम्यक ॥
नेत्र जाऊनि अंधत्व देख ॥ तेही देख पावली ॥ ५९ ॥
नेत्री न दिसेचि कांहीं ॥ चाचपीत वावरे स्वगृहीं ॥
मग आठवीतसे ह्रदयीं ॥ शेषशायी परमात्मा ॥ ६० ॥
ह्रदयीं परम गहिवरोन ॥ मग आठवी पूर्व कर्मातें जाण ॥
हे भगवान जनार्दन ॥ जाणून कर्म हें केलें ॥ ६१ ॥
मी तव अपराधी बहुत ॥ पुढें केवी होय माझा प्रांत ॥
म्हणोनि तळमळे ह्रदयांत ॥ निशिदिवस तळमळी ॥ ६२ ॥
आधीं कर्म जैसें करावें ॥ तात्काळ लागे तें भोगावें ॥
पुढें यमयातना ते स्वभावें ॥ न चुके कल्पांत काळीं ॥ ६३ ॥
यालागीं विवेकें करूनि ॥ सावध वर्तावें हो जनी ॥
पुढें अवघड यमजाचणी ॥ नरक विंदानीं सुटेना ॥ ६४ ॥
व्यासादिक महाऋषी ॥ वाल्मीकादी तपोराशी ॥
पुराणें करून ठेविली जगासी ॥ तरणोपायासी निर्धारें ॥ ६५ ॥
परी जग हें अलगट मोठें ॥ कोणी न जाती त्या वाटे ॥
म्हणोनि दुःखी होती अचाटे ॥ जातात वाटे यमपुराच्या ॥ ६६ ॥
असो ते विमळा सुंदरी ॥ दिवसनिशीं खेदकरी ॥
म्हणे धन्यतेची नारी ॥ भ्रतार आज्ञेनें वर्तत ॥ ६७ ॥
मी तंव अभागी मोठी ॥ परम दैवाची करंटी ॥
नेणें कांहीं हातवटी ॥ व्रतदानें उद्यापनें ॥ ६८ ॥
ऐसी करितां चिंता ॥ कालांतरें ती मृत्युपंथा ॥
पावती जाली ते तत्वता ॥ यमव्यथा दारुण ॥ ६९ ॥
यमदूतीं नेलें मारीत ॥ चित्रगुप्तें काढिलें लिखित ॥
मग ते जाचणीं नित्यानित्य ॥ भोगवीत तियेतें ॥ ७० ॥
दारुण ते यमयातना ॥ शास्त्रें बोलिली प्रकार नाना ॥
तदनुसार ते कमिनी ॥ भोगिती जाली दुःखातें ॥ ७१ ॥
आठवून आपुले आचरण ॥ अट्टहास्ये रडे आपण ॥
परी तेथें सोडविता कवण ॥ असे जाण सांग पा ॥ ७२ ॥
सोयरे आणि आप्त पाहीं ॥ हे तंव राहाती ठायींचे ठायीं ॥
परी तेथीची न जाणती सोई ॥ पाडिती अपाई प्राणिया ॥ ७३ ॥
मिळोन आप्तवर्ग सकळ ॥ घृत शर्करेचे मारिती कवळ ॥
म्हणती उत्तम प्रकारे काळ ॥ क्रमिला याचिया संगती ॥ ७४ ॥
सर्वसुखाचे सांगाती ॥ शेवटी कोणी कामा न येती ॥
ही तंव जनाची असे प्रवृत्ती ॥ न जाणति हिताहित ॥ ७५ ॥
कोणीही म्हणती ऐसे ॥ परलोकीं सार्थक करी हव्यासे ॥
ऐशिया लागी उपदेशे ॥ न सांगती कोणीही ॥ ७६ ॥
जरी ऐसा करिती उपदेश ॥ मग सकळही लागती पुण्यपंथास ॥
तंव यमपुरी पडतां वोस ॥ म्हणोनि पुण्यमार्गास नेणती ॥ ७७ ॥
असो ते विमला सुंदरी ॥ यातना भोगूनियां भारी ॥
मग टाकिली नरक अघोरीं ॥ कुंभपाकीं तियेते ॥ ७८ ॥
ऐशी ते कुंभपाकीं पडत ॥ रौरवाते झाली भोग प्राप्त ॥
क्रमितां वर्षे गणित ॥ छत्तिस सहस्र गर्जना पैं ॥ ७९ ॥
दीपनिर्नाशनात्सद्यो विमला दुःखिताभवत् ॥
तस्याः पुत्रतयं नष्टमधत्वं समुपागता ॥ ५ ॥
अदीर्घे तैव कालेन निधनं समुपागता ॥
त्रिंशद्वर्षसहस्त्रापि रौरवे नरकेस्थिता ॥ ६ ॥
मग जन्मा घातली ग्रामसूकरी ॥ मग व्याघ्र जन्मा दुसरी ॥
श्रृगाळ जन्म तीसरी ॥ वडवाघळी चौथीं पैं ॥ ८० ॥
पुनः मानवदेह पावोन ॥ निशादी जाली ते कामिन ॥
तेथें हिंसा कर्म दारुण ॥ घडलें जाण तिये तें ॥ ८१ ॥
मग मीन होऊनियां जळीं ॥ थिल्लरोदकांत तळमळी ॥
तयावरी ते घार जाली ॥ आकाश पोकळी फिरत ॥ ८२ ॥
ऐसे जन्म भोग भोगितां ॥ परम कष्ट जाले तत्वतां ॥
नको नको हे जन्मव्यथा ॥ श्रीरघुनाथा घडूं देऊं ॥ ८३ ॥
यापरी दीप विध्वंसन ॥ तेंचि कथिलें होय कारण ॥
ऐका पुढील कथन ॥ सुशीलेचें कैसें तें ॥ ८४ ॥
काळांतरें करून जाण ॥ तेही पावली असे मरण ॥
विष्णुदूतीं विमानीं वाहून ॥ नेलें पैं तियेतें ॥ ८५ ॥
एवं तया विमलयादीपप्रशमनात्फलं ॥
प्राप्तं दुःखं वियोगेन सुशीला सद्गतिंगता ॥ ७ ॥
नारी वापि नरोवापि यः करोति मलिम्लुचे ॥
स्नानं वा दीपकं वापि विप्रसेवनमेवच ॥ ८ ॥
यालागीं पुरुष अथवा नारी ॥ व्रत कीजे हो निर्धारी ॥
इये कलियुगा माझारी ॥ उपाव श्रीहरी पैं केला ॥ ८६ ॥
परम दयाळू दीननाथ ॥ ब्रीद सत्य करावया व्रत ॥
होऊनियां कृपावंत ॥ आदरें सांगत लक्ष्मीसी ॥ ८७ ॥
एवं दोघी स्त्रियांची दोन गती ॥ एक सद्गती एक अधोगती ॥
परी शांकली तें कवणगती ॥ ऐकिजे पुढती श्रोतेजन ॥ ८८ ॥
दोघी स्त्रिया पावतां निधन ॥ चित्तीं उदास तो ब्राह्मण ॥
तिघे पुत्र पावले मरण ॥ पुढें संतान नसेची ॥ ८९ ॥
म्हणोन तळमळ मानसीं ॥ रात्रंदिवस कुसुमुसी ॥
हे नवसंगती संगदोषीं ॥ घडे अनायासीं प्राणिया ॥ ९० ॥
पातक जें कायिक वाचिक ॥ तैसेंचि हें सांसर्गिक ॥
शास्त्राधार असे देख ॥ म्हणोन पातक बोलिजे ॥ ९१ ॥
यापरी कष्टी तो ब्राह्मण ॥ पावता झाला परम शीण ॥
काळांतरे पावला मरण ॥ नेला बांधून यमदूती ॥ ९२ ॥
पहिलाच ब्राह्मण पुण्यशीळ ॥ दानधर्म आचारशीळ ॥
यालागीं तयाते केवळ ॥ नसे हळहळ जाचणीची ॥ ९३ ॥
परी विष्णुलोकीं सुशीळेतें ॥ नारदें कथिलें तियेतें ॥
तिणें प्रार्थून विष्णुतें ॥ करुणामृत वचनें करूनी ॥ ९४ ॥
म्हणे देवदेवा ह्रषीकेशी ॥ तूं तव कृपाळू होसी ॥
तरी कोण दशा भ्रताराशीं ॥ निजमानसीं विचारा ॥ ९५ ॥
मग संतुष्ट होऊन नारायण ॥ तया आणवी धाडून विमान ॥
मग उभयतां दोघेजण ॥ वैकुंठ भुवना पावली ते ॥ ९६ ॥
संस्थाप्य संततिं भूमौ वैकुंठ निलयंगता ॥
सायुज्यं पति संयुक्ता पुनरावृत्ति दुर्लभं ॥ ९॥
याप्रकारें श्लोकार्थ बरवा ॥ श्रोति आदरें परिसावा ॥
न्यून पूर्ण क्षमा करावा ॥ दोष न ठेवावा मजलागीं ॥ ९७ ॥
पाहूनियां संमतातें ॥ अर्थान्वय वर्णिला येथें ॥
प्राकृत भाषा म्हणोन तीतें ॥ अव्हेर संतीं न करावा ॥ ९८ ॥
समर्था केला पाहुणेर बरवा ॥ म्हणोन दुर्बळातें अव्हेरावा ॥
हें केवी उचित थोरिवा ॥ विहित भावा न दिसे ॥ ९९ ॥
स्वस्ति श्रीमलमास महात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणींचें संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ सप्तमोऽध्याय गोड हा ॥ ७ ॥
ओव्या ॥ ९९ ॥ श्लोक ॥ ९ ॥
॥ इति सप्तमोऽध्यायः ॥

Explore More