Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 6

(Purushottam Maas Katha Adhyay 6)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 6

Purushottam Maas Katha Adhyay 6. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 209
श्री गणेशाय नमः
॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नमूं आतां सद्‍गुरु ॥ जो पराचाही परपरु ॥
जयाचे कृपेनें पसरु ॥ ग्रंथ निर्धार चाले हा ॥ १ ॥
आतां ऐका श्रोतेजन ॥ अधिक मास महिमा आख्यान ॥
जें श्रवण केलिया घडे पुण्य ॥ होय निरसन पापाचें ॥ २ ॥
पहा भगवंत केवढा दयाळू ॥ दीननाथाचा प्रतिपाळू ॥
झाडावया पापाचा मळू ॥ कथा अळुमाळू वदतसे ॥ ३ ॥
भगवन्मलमासे वै दीपदानस्य यत्फलं ॥
तत्सर्वं ब्रूही मे देव लोकाना हित काम्यया ॥ १ ॥
श्रीविष्णु रुवाच ॥ श्रुणु देवि प्रवक्ष्यामि रहस्यं पापनाशनं ॥
यत्कृत्वां पितृहा गोघ्नोब्रह्महा गुरुतल्पगः ॥ २ ॥
विघाती कूटसाक्षी वा सर्वपाप करोति वा ॥
मुच्यते नात्र संदेहो विष्णुलोकं स गच्छति ॥ ३ ॥
प्रश्न करितसे श्रीलक्ष्मी ॥ वदतसे कैवल्यधामी ॥
तेंचीं श्रवण कीजे तुम्हीं ॥ पाप क्षयातें जाणपा ॥ ४ ॥
जया वाटे कीं पाप जावें ॥ तयानें आधीं श्रवण करावे ॥
एकाग्र अवधान द्यावे ॥ ग्रंथानुमोदनी पै ॥ ५ ॥
तंव लक्ष्मी वदे जी स्वामिनाथा ॥ दीपदानाची व्यवस्था ॥
मज निरोपिजे तत्वता ॥ जेणें भवव्यथा निवारे ॥ ६ ॥
कवण पापाचिया रासी ॥ नष्ट होती दीपदानेशीं ॥
पूर्वी ऐसिया वृत्तासी ॥ आचरून पुण्यराशी तो झाला ॥ ७ ॥
हें आद्यंत निरूपण ॥ मज करवाजी श्रवण ॥
तंव बोले जनार्दन ॥ ऐकें कथन पुढारी ॥ ८ ॥
पितृहत्या गोहत्यारी ॥ ब्रह्महत्या गुरुहत्यारी ॥
कृतघ्न आणी परद्वारी ॥ दुराचारी मद्यप्राशक ॥ ९ ॥
कुटिल लबाड असत्यवादी ॥ असत्यसाक्षी तें प्रतिपादी ॥
मातापित्यातें त्यजुनि आधीं ॥ मातृगमनीं दुराचारी ॥ १० ॥
भ्रूणहत्या पूत्र हत्या पाहीं ॥ श्‍नुषाभगिनी कन्येतेंही ॥
याते रत जो स्वदेहीं ॥ ऐशी महापातकें अपार ॥ ११ ॥
तया पापाचें क्षाळण ॥ होय केलिया दीपदान ॥
आतां पावेतो मोक्षसदन ॥ संशय अन्य न धरावा ॥ १२ ॥
अधिकमासी मासवरी ॥ केशवा अर्पण दान करी ॥
प्रतिपदा आरंभ निर्धारी ॥ संपूर्ण मास वरी पै द्यावें ॥ १३ ॥
स्नान कीजे प्रातःकाळीं ॥ गंगायमुनासागरजळीं ॥
अथवा सरोवराचें पाळीं ॥ की जे प्रतिदिनी स्नानातें ॥ १४ ॥
हेंही न घडे कवणातें जरी ॥ वापीकूप तडागाचे परी ॥
स्नान कीजे निर्धारी ॥ अथवा स्वगृहीं शीतोदकें ॥ १५ ॥
शरीरीं सामर्थ्य नसलिया पाहीं ॥ प्रवाहा जावया शक्ति नाहीं ॥
शीतोदक नसे संवर्तेही ॥ तरीं बाध नाहीं उष्णोदका ॥ १६ ॥
संपूर्ण फलदं सम्यक् स्नानमुष्णेन वारिणा ॥
शीतेद्विगुणमेवस्यात्कूपेतश्च चतुर्गुण ॥ ४ ॥
नद्यां दशगुणं प्रोक्तं महानद्यां ततो दश ॥
सहस्रगुणितं प्रोक्तं महानद्योश्च संगमे ॥ ५ ॥
संपूर्णफल असे उष्णोदकीं ॥ तया द्विगुणित जाण शीतोदकीं ॥
वापीकूप आणि तटाकीं ॥ चतुर्गुणित जाण पां ॥ १७ ॥
नदी तीराचिया ठायीं जाण ॥ दशगुणित घडे पुण्य ॥
तया दशगुणें जाण ॥ घडे पुण्य गंगास्नानें ॥ १८ ॥
महागंगा क्षेत्री पाहीं ॥ अथवा सागराचे तीरींही ॥
संकल्पयुक्त स्नान केलें जिहीं ॥ तरी सहस्रगुणें पुण्य जोडे ॥ १९ ॥
ऐसें स्नानविधीतें सारून ॥ मग कीजे देवतार्चन ॥
स्वयें ताम्रपात्रीं आज्य घालून ॥ दीप लावून ठेविजे ॥ २० ॥
मग सत्पात्र ब्राह्मण ॥ पाचारावें तया लागून ॥
दीपपूजन करूनि जाण ॥ द्यावें दान ब्राह्मणातें ॥ २१ ॥
दक्षिणेसहीत दीप ॥ एक मासवरी साक्षेप ॥
केलिया होय निःपाप ॥ सुख अमूप ते पावती ॥ २२ ॥
आयुरारोग्य संतती अपार ॥ चुके यमयातना कीं अघोर ॥
॥ दीपदानें कांति सुंदर ॥ वर्धमान होय पै ॥ २३ ॥
अपमृत्यु गंडांतर ॥ दूर होय हा निर्धार ॥
ये विषयीं आन विचार ॥ न घडे साचार जाणपां ॥ २४ ॥
शतजन्मोत्थितं पामं मासार्धे नैव गच्छति ॥
जन्मांतर सहस्त्रैस्तु यदघं समुपार्जितं ॥ ६ ॥
सप्त जन्मार्जित जें पाप ॥ तेही झडे आपोआप ॥
शत जन्माचा जो लेप ॥ तोही अमूप झडतसे ॥ २५ ॥
परी श्रद्धापुरस्कर पाहीं ॥ नित्य नित्य हव्यास देहीं ॥
घडतो ऐसा संदेह नाहीं ॥ शास्त्रीं पाहीं हा निर्णयो ॥ २६ ॥
दीपदानाचा पर्वविधी ॥ जळकुंभ ठेविजे आधीं ॥
परिपूर्ण जळसंधी ॥ पूजाविधी करूनियां ॥ २७ ॥
तयावरी मग दीप ठेवूनी ॥ जळकुंभा सहीत दीजे दानीं ॥
एकमास वरी प्रतिदिनी ॥ करितां निर्वाणीं फळ लाभे ॥ २८ ॥
स्त्री अथवा पुरुषातें ॥ समान लाभ दोहीं तें ॥
सौभाग्य अथवा विधवेतें ॥ समान पुण्यातें पाविजे ॥ २९ ॥
वरकड करितां यज्ञदान ॥ द्रव्य पाहिजे तया लागून ॥
येथें अल्प वेचे महापुण्य ॥ सांगितले जाण साक्षेपे ॥ ३० ॥
यथाशक्ति ब्राह्मणभोजन ॥ भक्तिपुरस्कर करावें जाण ॥
श्रीलक्ष्मी नारायण म्हणोन ॥ संतर्पण करावें ॥ ३१ ॥
तयावरी शक्ति असेल पाहीं ॥ वस्त्रें अलंकार दक्षिणातेही ॥
भाव धरोनीं देहीं ॥ अति आदरे अर्पिजे ॥ ३२ ॥
नानापरी घृतमिश्रित ॥ अपूप अन्नें यथास्थित ॥
षड्रसें पक्वान्नें बहुत ॥ ब्राह्मणातें अर्पावीं ॥ ३३ ॥
गोभूहिरण्य दानांनीं ॥ जो अर्पी भूदेवा लागुनीं ॥
मलमासाशी प्रतिदिनीं ॥ तो मोक्षसदनीं पावतो ॥ ३४ ॥
आयुरारोग्य धनसमृद्धी ॥ अपमृत्यु न बाधी ॥
पुरे आयुष्याची अवधी ॥ तोवरी आरोग्यता देहासी ॥ ३५॥
वैश्यातें पशुधन प्राप्त ॥ शूद्राते सुखोत्पत्ति होत ॥
क्षत्रिय तो विजयी रणांत ॥ न बाधित शस्त्र घाय ॥ ३६ ॥
स्त्रियांतें वैधव्य नाहीं ॥ कुमारी तें निज भ्रतार तोही ॥
सुलक्षणीक प्राप्त होई ॥ व्रत प्रभावें ऐशिया ॥ ३७ ॥
नित्य करावें पुराणश्रवण ॥ रात्रौ कीजे हरिजाग्रण ॥
प्रातःकाळीं प्रातःस्नान ॥ दीपदान यथाविधि ॥ ३८ ॥
पूर्वी सरस्वती तीराचे ठायीं ॥ सुशर्मा नामें द्विज पाहीं ॥
पुत्र कलत्र सर्व आप्तही ॥ स्त्रीयुक्‍त नांदतसे ॥ ३९ ॥
भिक्षा मागून नित्यानित्य ॥ कुटुंबातें संरक्षित ॥
तयावरीही अतीत ॥ असलिया सांभाळीत माध्यान्हीं ॥ ४० ॥
धन्य ऐशियाचा संसार ॥ स्त्री असोनी स्वधर्मी नर ॥
रूपवती सेवेसीं सादर ॥ मनीं तिरस्कार न मानीं ॥ ४१ ॥
समयीं आलिया अतीत ॥ लाहें लाहे दुणावत ॥
तयातें असे तोषवित ॥ भोजनपानें आदरेंसी ॥ ४२ ॥
भिक्षार्थी याचे गृहातें ॥ सर्व संग्रहक कैचा तेथे ॥
परी समयीं असेल तें ॥ यथारुचि संपादी ॥ ४३ ॥
स्वपुत्राची आशा न धरी मनीं ॥ परम आल्हाद ब्राह्मणभोजनीं ॥
न उरो आपणा दुसरें दिनीं ॥ परि खेद मनीं मानिना ॥ ४४ ॥
ऐशी स्त्री धर्मानुकूळ ॥ तया पुरुषाचा सुफळ काळ ॥
तयावरी तुष्टे हो गोपाळ ॥ पावे दयाळ संकटीं ॥ ४५ ॥
परी ऐसें वर्ततां संसारीं ॥ तया अपुरें न पडे निर्धारी ॥
सदां वर्ततां सदाचारी ॥ पाहे मुरारी कसवटी ॥ ४६ ॥
तेथें सर्वदा जो संतुष्ट ॥ हर्षची मानी उत्कृष्ट ॥
मग तयावरी जगन्नाथ ॥ सदां संतुष्ट मानसीं ॥ ४७ ॥
असो आतां पाल्हाळ बहुत ॥ सुशर्मा यथाचारें वर्तत ॥
गृहीं धेनूसेवा नित्य करित ॥ उदर भरी ऐसिया परी ॥ ४८ ॥
नित्य करून प्रातःस्नान ॥ वरी करीतसे जपध्यान ॥
मग करूनियां भिक्षाटण ॥ अतीतासहीत भोजन करितसे ॥ ४९ ॥
धन्य ऐशियाचा संसार ॥ तोची प्रिय होय रमावर ॥
नाहीं तरी असाक्षी भोजन प्रकार ॥ न घडो निर्धार देहातें ॥ ५० ॥
अतिथि बैसवूनिया द्वारीं ॥ स्वगृहीं भोजन जो करी ॥
सोयरियाची प्रार्थना करी ॥ बरवियापरीं मिष्टान्न ॥ ५१ ॥
ऐसें भोजन घडे जयासीं ॥ तरी नरकीं वास तयासीं ॥
तें भोजन मांसभक्षणासी ॥ उदक प्राशनें रुधिर ॥ ५२ ॥
अतिथि अभ्यागता विरहित ॥ भोजन घडे जयातें नित्य ॥
तरीं सोमपानाचें फळ प्राप्त ॥ असे निश्चित निर्धारें ॥ ५३ ॥
ऐसा सुशर्मा निर्धारी ॥ पुराणश्रवण तृतीय प्रहरीं ॥
रात्रौ करि हरिजागरि ॥ तेणें तुष्टे नारायण ॥ ५४ ॥
ऐसी करिता काळक्रमणा ॥ पैसा वेची सत्कारणा ॥
तव मलमास प्रवर्तता जाणा ॥ करी विचारणा मानसीं ॥ ५५ ॥
म्हणे संचय नाहीं धनासी ॥ केवी घडे पुण्यराशी ॥
कवणें करावें दानासी ॥ व्रत प्रभावासी याचि पै ॥ ५६ ॥
मी तंव दरिद्री अत्यंत ॥ न घडेची परमार्थ ॥
दानधर्म यथास्थित ॥ न घडे किंचित मजलागीं ॥ ५७ ॥
ऐशी चिंता परम ह्रदयीं ॥ उद्‌भवली तयाशीं पाहीं ॥
म्हणें सार्थक घडलें नाहीं ॥ मूर्खदशा पाही या वाचे ॥ ५८ ॥
प्रतिदिनीं मौन्य धरून ॥ पुराणीं बैसतो जाऊन ॥
तंव तेथें निघालें दीपाख्यान ॥ केलें श्रवण यथा निगुती ॥ ५९ ॥
तोचि बोध चित्तीं ठसाऊन ॥ म्हणें हेंची करावें आपण ॥
मग प्रतिदिनीं दीपदान ॥ करी ब्राह्मण निजनिष्ठें ॥ ६० ॥
पुरुषोत्तम प्रीत्यर्थ भक्ती ॥ दान देत असे ब्राह्मणाप्रती ॥
ऐसा नेम चालवितां प्रीती ॥ काय निश्चिती वर्तलें ॥ ६१ ॥
एकादशीचे दिवशीं ॥ सुशर्मा बैसला जागरणासी ॥
दीप लावून घृतेसी ॥ संनिधेसी ठेवीत ॥ ६२ ॥
पूजा करून संकल्पयुक्त ॥ प्रातःकाळीं अर्पू ब्राह्मणातें ॥
ऐसा नेम करून ह्रदयांत ॥ प्रातःस्नानाते जातसे ॥ ६३ ॥
तंव घरची निद्रिस्त सर्वही ॥ जागृत तेथें कोणीच नाही ॥
तंव एक बिडाळक तेथें पाही ॥ मूषका लागीं डंसितसे ॥ ६४ ॥
तेथें दीपज्योति मंद झाली ॥ मूषक न देखे नेत्रयुगुळीं ॥
मग मार्जारे ते वेळीं ॥ केली नव्हाळी ते ऐका ॥ ६५ ॥
आपुल्या पुढल्या हातानें ॥ दीप सरसावित युक्तीनें ॥
मूषक दृश्य व्हावा तेणें ॥ म्हणोनि केला उपावो ॥ ६६ ॥
तों कृपाळु तो सर्वेश्वर ॥ मूषक पळाला तो सत्वर ॥
परी नवल वर्तले थोर ॥ ऐका समग्र भाविक हो ॥ ६७ ॥
तया मार्जारा ते वेळीं ॥ विमान उतरलें भूमंडळीं ॥
विमानीं बैसविताचि तात्काळीं ॥ देखे नेत्रकमळीं ब्राह्मण ॥ ६८ ॥
सुशर्मा स्नान करूनि आला ॥ तों हा चमत्कार देखिला ॥
मग बोलता जाला ते वेळां ॥ विमानस्थाते ते काळीं ॥ ६९ ॥
म्हणें देवदूत हो विज्ञापना ॥ माझा आणि जे हो मना ॥
या बिडाळकें पुण्याचरणा ॥ केलें म्हणोनि वाहिला विमानीं ॥ ७० ॥
तंव ते देवदूत सर्व समाचार ॥ तया ब्राम्हणातें कथिला साचार ॥
म्हणति हा तव संगीं उपकार ॥ केला उद्धार बिडाळका ॥ ७१ ॥
तरी संगसंगती दोष जैसा ॥ हाही पुण्यलेश जाण तैसा ॥
संवाद ऐकूनियां ऐसा ॥ चित्त उद्विग्न तें जालें ॥ ७२ ॥
म्हणे हे जनार्दना वासुदेवा ॥ हे वैकुंठमुरारे केशवा ॥
अच्युता अनंता माधवा ॥ करुणार्णवा दीनबंधो ॥ ७३ ॥
कवण पुण्याची या रासी ॥ बिडाळक आचरला देहासी ॥
नेणे पूर्वसकृताच्या राशी ॥ म्हणोनि विमानासीं प्राप्तता ॥ ७४ ॥
हे जगदिशा जनार्दना ॥ हे कैवल्यदानीं मधुसूदना ॥
क्षीराब्धिशायी नारायणा ॥ करुणाघना दीनबंधो ॥ ७५ ॥
मी तंव अभागीं पूर्ण ॥ नेणेच कधीं पुण्यचरण ॥
मज पापीयातें स्वर्गभुवन ॥ प्राप्त कोठून होय पै ॥ ७६ ॥
ऐसा सद्गदीत अंतरीं ॥ परम द्रवला ह्रदयमंदिरीं ॥
अश्रु चालिले नेत्रद्वारीं ॥ करुणास्वरीं भाकीत ॥ ७७ ॥
तयाची करुणा ऐकून ॥ कृपेनें द्रवला नारायण ॥
तयातें चतुर्भुज करून ॥ तात्काळ वाहिला विमानीं ॥ ७८ ॥
यालागीं केलें पुण्याचरण ॥ तें कदापि वाया न जाय जाण ॥
वायां गेलिया येईल उणें ॥ ब्रीदपूर्ण तोरडीं असे ॥ ७९ ॥
स्वबुद्धी अथवा सत्संगती ॥ पुण्य घडावें भलत्या रीती ॥
तेणें संतोष श्रीपती ॥ अधोगती नवजाय ॥ ८० ॥
धन असूनियां पदरीं ॥ जो दान धर्मातें न करी ॥
तया पापिया नरक अघोरी ॥ जन्मवरी सुटेचिना ॥ ८१ ॥
म्हणोनि अवचिता नरदेहो ॥ सुकतें लाधला पाहा हो ॥
न विचारितां न्यायान्यायो ॥ करी संचयो धनातें ॥ ८२ ॥
ऐसी वयसा संसारी वेंचितां ॥ केवी घडे सार्थकता ॥
तेचि वयसा निघोनि जातां ॥ मग धन वार्ता केउती ॥ ८३ ॥
संचय केला ज्या धनातें ॥ तो राहे जेथील तेथें ॥
एकलेची जाणें घडे त्याते ॥ जेथील तेथे निजात्मा ॥ ८४ ॥
धर्म नेणे काहीं ॥ जडला प्रवाहीं जन्मपंक्‍ती ॥ ८५ ॥
हाची जाणोनि अभिप्रावो ॥ कृपाळू जो देवाधिदेवो ॥
म्हणोनि सुलभ उपावो ॥ निर्मूनि ठेविला जनाते ॥ ८६ ॥
म्हणोनि सुशर्मा द्विजवर ॥ वर्ततसे दरिद्राचार ॥
परी चित्तीं धरूनि निर्धार ॥ केला उद्धार स्वयें तेणें ॥ ८७ ॥
नवियोगमवाप्नोति दीपदान प्रभावतः ॥
आधयोव्याधयश्चैव दीपदानात्प्रणाशिताः ॥ ७ ॥
भीतोभयात्प्रमुच्येत बद्धोमुच्येत बंधनात् ॥
ब्रह्महत्यादिभिः पापैर्दीपदानप्रभावतः ॥ ८ ॥
सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोकं सगच्छति ॥
अत्राप्युदाहरंतीमितिहासं पुरातनं ॥  ९ ॥
यालागीं प्राणियातें पाहीं ॥ सुलभ उपाव निर्मिला महीं ॥
म्हणोनि आचरावें देहीं ॥ सार्थकता पाहीं अनायासें ॥ ८८ ॥
ऐसा इतिहास पुरातन ॥ लक्ष्मीतें निवेदी नारायण ॥
म्हणोनि तुम्हां श्रोतेजन ॥ केलें निरोपण यथामतीं ॥ ८९ ॥
तरीं ग्रंथांतरी ठेवूनि विश्वास ॥ स्वयें करा हो या व्रताचा सायास ॥
जेणें चुके हो गर्भवास ॥ चुके अनयासें जन्मपंक्ति ॥ ९० ॥
येथें मुख्य भावासीं कारण ॥ भावें संतुष्ट जनार्दन ॥
येर अभाविकतें पतन ॥ न चुके जाण निर्धारें ॥ ९१ ॥
ऐका भावार्थासीं कारण ॥ तुलसीदळें संतुष्टे जनार्दन ॥
म्हणोनि गर्वरहित जाण ॥ करावें पूजन महाविष्णूचें ॥ ९२ ॥
हाचि जाणोनि निर्धार ॥ वाग्वल्ली तुळसीदळ साचार ॥
तेणें अर्चिला रमावर ॥ प्रीति पडिभारें आपुलिया ॥ ९३ ॥
स्वस्तिश्री अधिकमाहात्म्य ग्रंथ ॥ पद्मपुराणींचे संमत ॥
मनोहर सुतविरचित ॥ षष्ठोऽध्याय गोड हा ॥ ६ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
ओंव्या ॥ ९३ ॥ श्लोक ॥ ९ ॥
॥ इति षष्ठोऽध्यायः ॥

Explore More