नीरांजन करूं तुजला परिपूर्णकामा॥
अतिसज्जन मनमोहनरजनीकरवदना॥
अगणित महिमा तुझा न कळे सुरगणा।
वदतो कंठी वाणी सरसीरुहनयना॥१॥
सोडुनी शर पळवीसी पश्चिमजलधीसी॥
तुजसम रणधीर जगी न पडे दृष्टीसी।
प्रताप थोर तुझा न कळे कवणासी॥२॥
दानव दहन करोनी वससी गिरिशिखरी॥
क्षत्रिय मारूनि अवनी केली निर्वैरी।
सात्विक राजस तामस त्रिगुणां उद्धरी॥३॥
त्यांचे भवभय नाही जंववरि शशितरणी॥
शर मारुनी उद्भवली गंगा जनतरणी।
चिंतामणि शरणागत निश्चल तव चरणी॥४॥
