सुखसदने शशिवदने अंबे मृगनयने।
गजगमने सुरनमने कोल्हापुरमथने॥
सुरवर वर्षति सुमनें करुनियां नमनें।
भयहरणे सुखकरणे सुंदरी शिवरमणे॥१॥
कुंचित केश विराजित मुगुटांतून भाळीं॥
रत्नजडित सुंदर अंगी कांचोळी।
चिद्गगगनाचा गाभा अंबा वेल्हाळी॥२॥
पीतांबर सुंदर कसियेला कांसे॥
कटितटि कांची किंकिणि ध्वनि मंजुळ भासे।
पदकमळ लावण्ये अंबा शोभतसे॥३॥
तेजा लोपुनि गेले रविशशि निज करणीं॥
ब्रह्महरिहर सकळिक नेणति तव करणी।
अद्भुत लीला लिहितां न पुरे ही धरणी॥४॥
झगझगित समरंगी शोभतसे शोभा॥
दरधर मधुकर होउनी वर्णितसे अंबा॥५॥
