प्रणिपात साष्टांग तुज गंगाधरा॥
त्यामाजी अवतरला जगताचा स्वामी॥
व्याडी स्थापित लिंगे गुप्तचि राहिला।
शरणागत जे भाविक तारित त्यां सकळा॥१॥
गरुडासह मारूती नंदी तो पुढती॥
श्रीपती लक्ष्मी सूर्य भवती बैसले।
पंचायतन रूपे मंदिर शोभले॥२॥
सप्त वदनी फणिधर धरतो वरि छत्र॥
संतत धार धराया अभिषेक पात्र।
ध्यानचि सुंदर दिसले गिरीशा सुपात्र॥३॥
