Lord Vishnu

अधिक (पुरुषोत्तम) मास कथा अध्याय 17

(Purushottam Maas Katha Adhyay 17)

Also known as Purushottam Maas Katha · Adhik Maas Katha · Adhik Maas Katha adhyay 17

Purushottam Maas Katha Adhyay 17. The Adhik Maas Katha, also called the Purushottam Maas Mahatmya — the mahatmya of the intercalary month that the lunar calendar adds roughly every third year. The month was scorned as malmas, the impure month, until Vishnu took it as his own and gave it his name; the katha is read through, one adhyay a day, for the length of the month.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

#of 211
श्रीगणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥
जयजयाजी रघुराया ॥ अनाथ नाथाप्राणसखया ॥
दुर्धर हे तुझी माया ॥ निवारीं भयापासुनी ॥ १ ॥
मी तव अत्यंत दीन ॥ पदरीं नसे कांहीं धन ॥
जेणें घडे दान पुण्य ॥ हें तो न घडे जाण सर्वथा ॥ २ ॥
परी विश्वास बैसला एके ठायीं ॥ नामाविण सार्थक नसे कांहीं ॥
म्हणोन भलत्या प्रकारें पाहीं ॥ नाम ह्रदयीं वसों दे ॥ ३ ॥
सकृदुच्चरितं येन हरिरित्यक्षरद्वयं ॥
बद्धः परिकरस्तेन मोक्षाय गमनं प्रति ॥ १ ॥
यालागीं नाही हेत धरिला ॥ दुसराही वाक्य आधार ऐकिला ॥
नारदाप्रति अनुवादला ॥ स्वयें जनार्दनरूपें ॥ ४ ॥
नाहं वसामि वैकुंठे योगिनां ह्रदयेरवौ ॥
मद्भक्‍ता यत्र गायंति तत्र तिष्ठामि नारद ॥ २ ॥
ऐसिया व्यासवचनें ॥ विश्वास धरिला जीवप्राणें ॥
कथा कुशळता कांहीं नेणें ॥ आणीक नेणे साधन ॥ ५ ॥
आतां कळें तैसें करीं ॥ तारीं अथवा मारीं ॥
उचित येईल तें करीं ॥ अयोध्यापुरवासिया ॥ ६ ॥
ऐका श्रोतेहो सादर ॥ मलमाहात्माचा विस्तार ॥
कथाभाग अपूर्व फार ॥ लक्ष्मीनारायण संवाद ॥ ७ ॥
श्रीभगवानुवाच ॥ श्रृणुदेवि प्रवक्ष्यामि कथामाश्चर्यकारिणीं ॥
मलिम्लुचस्य मासस्य क्रुतस्नानत्रयस्यच ॥ ३ ॥
लक्ष्मीतें वेद जनार्दन ॥ मलमासी करितां स्नान ॥
परि दिनत्रय करितां जाण ॥ तेंही महिमान अवधारा ॥ ८ ॥
जयातें शक्ति नाहीं शरीरीं ॥ स्नान करितां एकमास वरी ॥
तयानें त्रिरात्र बरविया परी ॥ स्नानविधि सारिजे ॥ ९ ॥
तरी येविषयींचा इतिहास ॥ अवधारी जे सावकाश ॥
श्रवणकरितां विशेष ॥ साधे यश तयातें ॥ १० ॥
पूर्वी दक्षिणदिशे पवित्र ॥ प्रतिष्ठान पुण्यक्षेत्र ॥
गंगाप्रवाह विचित्र ॥ ब्राह्मणवर्णी सुपात्र पैं ॥ ११ ॥
ब्रह्मवृंदांचा समुदावो ॥ ठायीं ठायीं वेदघोष पाहाहो ॥
चारीवर्ण स्वधर्म पाहा हो ॥ यथाचारें वर्तती ॥ १२ ॥
षट्‍कर्मिरत ब्राह्मण ॥ अध्ययन अध्यापन ॥
समयीं अतिथि आलिया जाण ॥ देती भोजन यथासुखें ॥ १३ ॥
श्रुतिस्मृति पुराणें ॥ घरोघरीं हरिकीर्तनें ॥
वेदघोष पारायणें ॥ सदांसर्वदा सारखीं ॥ १४ ॥
तंव तया नगरीं एक ब्राह्मण ॥ धर्मशर्मा नामाभिधान ॥
सदाचारें सुखसंपन्न ॥ सर्वज्ञ दयाळु तो ॥ १५ ॥
तयाची स्त्री परम पतिव्रता ॥ काशीनामें साध्वी विख्याता ॥
एकोमय वर्तती उभयतां ॥ वृद्ध अवस्था दोघातें ॥ १६ ॥
पोटीं संतान नसे कांहीं ॥ परी विद्याबळें मान्यता होई ॥
विशेष भाव सर्वाठायीं ॥ पूजासनीं श्रेष्ठता ॥ १७ ॥
उभयतां समान वयस ॥ तव पातलिया मळमास ॥
गौतमी तटी स्नानास ॥ नारी नर समस्त जाताती ॥ १८ ॥
ऐसें वर्ततां ते अवसरीं ॥ विप्रस्त्रियेनें देखिलें नेत्रीं ॥
मनामाजी विचार करी ॥ म्हणे कवण परी करावी ॥ १९ ॥
जन जाताती स्नानासी ॥ आचरताती पुण्याचरणासी ॥
शक्ति नाहीं माझिया शरिरासी ॥ कवण उपायासी करूं आता ॥ २० ॥
ऐसी चिंता करितां ह्रदयात ॥ तंव पति पातला गृहांत ॥
येरी पुसतसें वृत्तांत ॥ खेदयुक्त आजि कांहीं ॥ २१ ॥
येरू म्हणे स्वामीराजा ॥ वृथा जन्म हा पैं माझा ॥
नेमधर्म तपवोजा ॥ अधोक्षजा नेंणें मी ॥ २२ ॥
मलमास तो पुण्यागळा ॥ स्नानातें जाती विप्रमेळा ॥
स्त्री बाळ वृद्ध सकळां ॥ करिती सोहळा उपचारें ॥ २३ ॥
ते देखो न माझे जीवीं ॥ चिंता वाटतसे ह्रदयीं ॥
परी शरीरीं शक्ति नाहीं ॥ यालागीं पाहीं उद्विग्न मी ॥ २४ ॥
ऐकूनि स्त्रियेचें उत्तर ॥ कृपेनें द्रवलें विप्रअंतर ॥
काय बोले प्रत्युत्तर ॥ तें साचार परिसीजे ॥ २५ ॥
धन्य ते उभयतां पवित्र ॥ तयाचें दर्शने ॥
पवित्र गाव नाहींतरी चित्रविचित्र ॥ स्त्री पुरुष चरित्र अवधारा ॥ २६ ॥
स्त्रिया आचरती नेमधर्म ॥ भ्रतार क्षुधेनें तळमळे परम ॥
तयावरी क्रोधयुक्त अधम ॥ बोले काय कामिनीतें ॥ २७ ॥
म्हणे तुम्हांतें स्नान नाहीं संध्या नाहीं ॥ पाकसिद्धी जाली कीं नाहीं ॥
या विरहित आणीक कांहीं ॥ दूजा नाहीं व्यापार ॥ २८ ॥
स्वयें पुण्य करवेना ॥ दूजियाचें देखों शकेना ॥
आतां क्षणभरी निवांत बैसा ना ॥ मी येत्यें पुराणाहूनी ॥ २९ ॥
तंवतरी निद्रा करा स्वस्थ ॥ लवकरी जेवितां देह पोसत ॥
शेवटी मसणवटी होय प्राप्त ॥ ऐसें ज्ञान सांगत भ्रतारा ॥ ३० ॥
भ्रतारें बोधावें स्त्रियेसीं ॥ शास्त्ररीती आहे ऐसी ॥
सांप्रत स्त्रीधर्मासीं ॥ न भूतो भविष्यति ॥ ३१ ॥
असो ऐसी नव्हे विप्र ललना ॥ नुलंघी कधीं पतिवचना ॥
धन्य ते पतिव्रता अंगना ॥ विप्रराणा संतोषे ॥ ३२ ॥
मग स्त्रियेतें बोले उत्तर ॥ उभयतां जराभूत शरीर ॥
चालतां न ठाके गंगातीर ॥ तरी एक विचार अवधारीं ॥ ३३ ॥
संपूर्ण मासवरी करितां स्नान ॥ शरीरीं अवकाश न दिसे जाण ॥
तरीं त्रिरात्री व्रत संपूर्ण ॥ करूं आपण उभयतां ॥ ३४ ॥
ऐसा विचार करूनियां ॥ त्रिरात्र जाती तटाकिया ॥
एकमेकाचा हस्त धरूनियां ॥ जाती लवहाह्या स्नानातें ॥ ३५ ॥
उषःकालीं करूनियां स्नान सारूनियां तीळतर्पण ॥ स्वगृहीं येती परतून ॥
देती दान द्विजातें ॥ ३६ ॥
शक्तिनुसार अपूप अन्न ॥ ते कांस्यपात्रीं निक्षेपून ॥
घृतासहित किंचित सुवर्ण ॥ देती दान सत्पात्रीं ॥ ३७ ॥
मग पाकसिद्धी करून ॥ स्वपंक्तीसीं-विप्र पाचारून ॥
यथारूचीं करीती भोजन ॥ आनंद मना उभयतांच्या ॥ ३८ ॥
ऐसे लोटले दोन दिवस ॥ तिसरें दिनीं चालिले गंगेस ॥
तंव अपूर्व वर्तलें त्या समयास ॥ सावकाश अवधारा ॥ ३९ ॥
एक याम उरली रजनी ॥ उभयतांचे निजध्यास असे मनीं ॥
म्हणोन अपरात्रीच उठोनी ॥ स्नानालागुनी चालिले ॥ ४० ॥
स्नानार्थं सर्वं सभारान् गृहीत्वा गौतमीप्रति ॥
गमनं कृत्वामागत्यमार्गे कश्चित् क्षुधाकुलः ॥ ४ ॥
तंव एकाएकीं समोर ॥ पिशाच उभा राहिला थोर ॥
लंबोदर दीर्घ शरीर ॥ क्षुधातुर उभा ठेला ॥ ४१ ॥
मस्तकीं केश विखुरले ॥ ते धूम्राकार आरक्त डोळे ॥
नखाचे गुंडाळे वळले ॥ जिव्हां आवाळें चाटित ॥ ४२ ॥
दंत विशाळ दीर्घ थोर ॥ केवळ अस्थींचा पंजर ॥
उभा ठेला नग्न दिगंबर ॥ देखून विप्र कांपतसे ॥ ४३ ॥
विप्र ललना भयभीत ॥ केउते उदलें अरिष्ट अद्‌भुत ॥
पुण्यक्रियेसी विघ्न प्राप्त ॥ अकस्मात उदेलें ॥ ४४ ॥
नेणों कर्माचें विंदान ॥ आम्हां पुण्य घडेल कोठून ॥
स्नानातें आजी तिसरा दिन ॥ निवारीं विघ्न केशवा ॥ ४५ ॥
तंव तो पिशाच वृक्षातें ॥ आळेपिळे असे घेत ॥
नयनीं देखून उभयातें ॥ धांवून येत सन्निध ॥ ४६ ॥
तद्‌दृष्ट्‍वा विकृतिं भूतं धर्मशर्मा द्विजोत्तमः ॥
उवाचवचनं सूक्ष्मं कोऽसित्वं भीमदर्शनः ॥ ५ ॥
विप्रें धैर्य धरून मनीं ॥ बोलता झाला तेच क्षणीं ॥
म्हणे तूं तव कोण या स्थानीं ॥ आलासि कोठूनीं सांगपां ॥ ४७ ॥
ऐकून विप्राचें उत्तर ॥ येरें घातला नमस्कार ॥
पूर्वस्मरण जालें साचार ॥ बोले उत्तर ब्राह्मणातें ॥ ४८ ॥
ऐक भूदेवा वहिलें ॥ तव दर्शनं पावन झालें ॥
करद्वय जोडून वहिलें ॥ विप्रालागीं तेधवा ॥ ४९ ॥
पिशाच जोडितां कर ॥ विप्र भीतीनें गेला दूर ॥
कांपतसे थरथर ॥ झाला स्थीर ते काळीं ॥ ५० ॥
मग तो पिशाच बोलें वचन ॥ मी पावन जालों तव दर्शन ॥
पूर्व स्मरण आठवलें जाण ॥ ऐकें कथन भूदेवा ॥ ५१ ॥
पूर्वी मी धनवंत सावकार ॥ सकळ वस्तूंचा रक्षणार ॥
माझियां धनासीं नाहीं पार ॥ सौख्य अपार भोगी मीं ॥ ५२ ॥
दासदासी स्वगृहीं ॥ गोमहिषी खिल्लारें पाहीं ॥
पुत्र कन्या स्नुषा सर्वही ॥ मिती नाहीं भाग्यातें ॥ ५३ ॥
परी स्वप्नींही नेणें धर्मदान ॥ मग कैचें पुराणश्रवण ॥
नेणें कधीं हरिकीर्तन ॥ नाही दर्शन संताचें ॥ ५४ ॥
सदां सर्वदां चित्त द्रव्यावरी ॥ विप्र भोजन न घडे तिळभरी ॥
तंव पातली महामारी ॥ जालों शरीरीं हतकाया ॥ ५५ ॥
यमदूतीं नेला मारित ॥ कुंभपाकादी जाचणी तेथ ॥
मज भोगविली अमित ॥ ते न सांगवत माझेनी ॥ ५६ ॥
यमजाचणी अपार ॥ सांगतां उलों पाहे अंतर ॥
शब्द न फुटे बाहेर ॥ बोलता उत्तर तुम्हांसीं ॥ ५७ ॥
ऐसें दुःख बहुत ॥ मज भोगविती यमदूत ॥
मग मज ढकलून देत ॥ चांडाळ योनींत जन्मलों ॥ ५८ ॥
तिसरे जन्मीं भिल्ल जालों ॥ चौरकर्म करूं लागलों ॥
वाट पाडूं लागलों ॥ मारूं लागलों प्राणियां ॥ ५९ ॥
जीवमात्राचा करीं घात ॥ पुराणिकातें जिवें मारित ॥
साधुसंताते द्वेषित ॥ नाहीं भीत पापातें ॥ ६० ॥
परद्वारातें मिती नाहीं ॥ ऐसें पाप वर्तलों देहीं ॥
तंव भगेंद्रें लिंग पाहीं ॥ पतन जालें शरीर ॥ ६१ ॥
मग लागला क्षयरोग ॥ मृत्यु पावलों सवेग ॥
तंव यमलोकींचा संग ॥ सांगता भोग उदेला ॥ ६२ ॥
माझें पाप अति दुस्तर ॥ जाणूनियां यमकिंकर ॥
असिपत्र नरक अघोर ॥ भोगविले फार मजलागीं ॥ ६३ ॥
ऐसे तीस सहस्र वर्षेवरी ॥ क्लेश भोगविले शरीरीं ॥
मग पिशाच योनि निर्धारी ॥ प्राप्त जाली मजलागीं ॥ ६४ ॥
निवेदिलासे समस्त ॥ परि तव दर्शनें करुनि मुक्त ॥
होईन ऐसें वाटतें ॥ ६५ ॥
ऐसा माझा पूर्ववृत्तांत ॥ निवेदिलासे समस्त ॥
परी तव दर्शनें करूनि मुक्त ॥ होईन ऐसें वाटतें ॥ ६५ ॥
तरी ब्राह्मण ह्रदय कोमळ ॥ करी परोपकार अढळ ॥
जेणें निरसे पिशाचमळ ॥ होई दयाळ महाराजा ॥ ६६ ॥
परउपकारी द्विजवर्या ॥ आचरसी सद्‍वृत्ती सक्रिया ॥
तरीं मातें उपकार करूनियां ॥ निवारींया भयापासुनी ॥ ६७ ॥
ऐसी ग्लानी करून ते काळीं ॥ बोलतसे करुणा मेळीं ॥
विप्र द्रवला ह्रदयकमळीं ॥ अभयवाणीं बोलत ॥ ६८ ॥
म्हणे तो अकिंचन ब्राह्मण ॥ गांठीस नाही कांहीं धन ॥
जेणें करितां घडे धर्मदान ॥तेंही साधन नेणें मी ॥ ६९ ॥
परी मळमास असे प्रस्तुत ॥ त्रिरात्री स्नानातें असे जात ॥
तयामाजी दोन दिवस जाले सतत ॥ उर्वरित दिन एक पैं ॥ ७० ॥
तरीं आम्ही स्नान करून मागुती येतां ॥ तोंवरी तूं स्थिर राहें आतां ॥
पुढें विचार सुचेल तत्वतां ॥ तोची व्यथा परिहारी ॥ ७१ ॥
ऐसा वदोनी प्रश्न तयासी ॥ उभयतां गेले स्नानासी ॥
येरू बैसला मार्गासी ॥ केधवां येती म्हणोनी ॥ ७२ ॥
जळो ही दुराशा पापीण ॥ इणें नाडिलें समग्रजन॥
न सोडी कवणा लागून ॥ दुरत्यय जाणे आशा हे ॥ ७३ ॥
तापसी होकां संन्यासी ॥ भूत अथवा पिशाचासी ॥
रंक हो कां रायासी ॥ आशा कवणासी सुटेना ॥ ७४ ॥
जेणें आशेचा त्याग केला ॥ तोचि जाणावा मुक्त जाला ॥
येर तो जगत्रय भला ॥ सर्वही गोंविला आशेनें ॥ ७५ ॥
असो तो पिशाच आशाबद्ध ॥ मार्ग लक्षीतसे सुबद्ध ॥
तों येरीकडे गंगाजळीं ब्रह्मवृंद ॥ स्नानें करिती अद्यमर्षणीं ॥ ७६ ॥
सारूनियां नित्य कर्म ॥ मागे परतला विप्रोत्तम ॥
तंव मार्गी तो अधम ॥ वाट पाहत बैसला ॥ ७७ ॥
केधवां येईल म्हणोनी ॥ आशाबद्ध निज मनीं ॥
मार्ग लक्षीत बैसला ध्यानीं ॥ जेवीं कामिनी जारातें ॥ ७८ ॥
कीं दाता लक्षीतसे याचक ॥ अन्नार्थी लक्षी अन्नोदक ॥
तृषार्थी लक्षी गंगोदक ॥ तेवीं देख पिशाचतो ॥ ७९ ॥
विप्रातें देखून नयनीं ॥ नमस्कार घातला धरणी ॥
म्हणे दयावंता मोक्षदानी ॥ दावी करणी आपुली पैं ॥ ८० ॥
करुणा शब्द ऐकून कानीं ॥ विप्र द्रवला अंतःकरणीं ॥
मग तयातें आश्वासुनी ॥ उदक करी घेतलेसें ॥ ८१ ॥
म्हणे महापुरुषा ऐक वचन ॥ त्रिरात्री स्नानाचें जे पुण्य ॥
तें तुज म्यां केलेंसे अर्पण ॥ होऊं उद्धरण पैं तुझें ॥ ८२ ॥
ऐसें वचन बोलुनी ॥ उदक घातलें ते चरणीं ॥
तंव नवल वर्तलें तें सज्जनीं ॥ सावधमनी परिसावें ॥ ८३ ॥
पूर्ण दयाळु दीननाथ ॥ दासाचें उणें पडो नेदी किंचित ॥
आपुली ब्रीदावळी सांभाळीत ॥ महिमा वाढवीत भक्ताचा ॥ ८४ ॥
मग स्वर्गीहूनी विमान ॥ उतरतें जालें तेच क्षण ॥
चतुर्भुज विष्णुगुण ॥ समान तेजस्वी ॥ ८५ ॥
परम रमणीय लखलखीत ॥ माजी घंटा घणघणित ॥
ऐसें विमान अकस्मात ॥ नयनीं देखत विप्र तो कां ॥ ८६ ॥
दिव्यदेही करून पिशाच तें ॥ विमानीं वाहिलें तयातें ॥
तंव तो स्तुतिवाद गर्जत ॥ भावें नमीत भूदेवा ॥ ८७ ॥
म्हणे करुणाकरा विप्रवर्या ॥ कृपासागरा परम उपकारिया ॥
वेंचून आपली पुण्यक्रिया ॥ केला मज पापिया उद्धार ॥ ८८ ॥
धन्य ते परोपकारी जन ॥ परकाजीं वेंचिती प्राण ॥
तयावरी संतुष्टे जनार्दन ॥ न लागे आन साधन पैं ॥ ८९ ॥
असो ऐसा पिशाच उद्धरिला ॥ तीन जन्मातें मुक्त जाला ॥
तीन स्नानानें पुण्यागळा ॥ तात्काळ पावला मोक्षातें ॥ ९० ॥
ऐसा प्रत्यय देखून मनीं ॥ पुनः नेम धरिला ब्राह्मणीं ॥
उभयतां गेलें उद्धरोनी ॥ ते वैकुंठ भुवनीं वास्तव्य ॥ ९१ ॥
हें महात्म स्नानाचें ॥ सांगितलें तीन दिवसांचें ॥
अगणित पुण्य एक मासाचें ॥ महिमान स्नानाचें आगळें ॥ ९२ ॥
ऐसा कथाभाग समग्र ॥ लक्ष्मीतें वदे शारंगधर ॥
तोची प्राकृतभाषे सविस्तर ॥ केला उद्धार श्रोतियांचा ॥ ९३ ॥
म्हणोनी भावार्थ धरोनी ॥ व्रत आचरावें सज्जनीं ॥
अमान्य न माना कोणी ॥ व्यासवाणी सत्य हे ॥ ९४ ॥
मी तंव संतांचा पाईक ॥ चातुर्य कळा नसे ठाऊक ॥
परी तेथें वदविता एक ॥ रघुनायक दाशरथी ॥ ९५ ॥
श्रोतियांवक्तियांचे अंतरीं ॥ तोचि व्यापक सर्वांतरी ॥
म्हणोनी प्रार्थनेची वैखरी ॥ कुंठित निर्धारी जालीसे ॥ ९६ ॥
इति श्रीअधिक माहात्म्य ग्रंथ ॥ पद्मपुराणींचे संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ सप्तदशोऽध्याय समाप्तः ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
ओव्याची संख्या ॥ ९६ ॥ श्लोक ५ ॥
॥ इति सप्तदशोध्यायः ॥

Explore More