पंचारती ओवाळू श्रीपति तुज भक्तिभावा॥
जय जय दीनदयाळा...॥
परिमळ द्रव्यासहित पुष्पमाळा अर्पून॥
धृतयुक्त शर्करामिश्रित गोधूमचूर्ण।
प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायणा॥
जय जय दीनदयाळा...॥
दरिद्र दवडूनी अंती त्याते मोक्षपदा नेले॥
त्यापासुनि हे व्रत कलियुगी सकळां श्रुत झाले।
भावार्थे पूजितां सर्वा ईच्छित लाभले॥
जय जय दीनदयाळा...॥
इच्छित पुरता मदांध होऊनि व्रत न आचरिले॥
त्या पापाने संकटी पडुनी दुःखहि भोगीले।
स्मृति होऊनि आचरिता व्रत त्या तुवाचि उद्धरिले॥
जय जय दीनदयाळा...॥
क्षोभ तुझा होताचि तयांचि नौका बुडाली॥
अंगध्वज राजासी यापरी दुःखस्थिती आली।
मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णी पसरली॥
जय जय दीनदयाळा...॥
पतिची नौका तरली देखे कलावती नयनी॥
अंगध्वज राजासी पुत्र भेटती येउनी।
ऐसा भक्तां संकटि पावसि तू चक्रपाणी॥
जय जय दीनदयाळा...॥
इच्छित पुरविसी त्यांते देउनि संतति संपत्ती॥
संहरती भय दुरिते सर्वहि बंधने तुटती।
राज रंक समान मानुनि पावसी श्रीपती॥
जय जय दीनदयाळा...॥
भक्तिपुरःसर आचरती त्यां पावसि जगदीशा॥
भक्तीचा कनवाळू कल्पद्रुम तू सर्वेशा।
मोरेश्वरसुत तुज विनवी भवनाशा॥
जय जय दीनदयाळा...॥
